शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी एकवटले मराठा समाजबांधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:30 IST

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आरक्षणासाठी येथील मराठा समाजबांधवानी एकत्र येवून सोमवारी (दि.३०) शहरात मोर्चा व मोटारसायकल रॅली काढून आरक्षणाची मागणी रेटून धरली.

ठळक मुद्देधरणे, रॅली व मोर्चा : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आरक्षणासाठी येथील मराठा समाजबांधवानी एकत्र येवून सोमवारी (दि.३०) शहरात मोर्चा व मोटारसायकल रॅली काढून आरक्षणाची मागणी रेटून धरली. पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे देऊन उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा आंदोलन तीव्र होऊन ते चिघळत चालले आहे. या आंदोलनात येथील मराठा समाजानेही उडी घेतली. सोमवारी (दि.३०) येथील मराठा समाजबांधवांनी आंबेडकर चौकातील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे दिले. त्यानंतर आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दीपक कदम, पंकज सावंत, प्रतीक कदम, पवन शिंदे, रमेश दलदले, दत्ता सावंत, मोहन काळे, महेंद्र तुपकर, विवेक जगताप, चंद्रकांत सनस, राजू तुपकर, होमेंद्र तुपकर, विजय माने, महेंद्र बढे, सुशिल केकत, महेंद्र माने, मुरलीधर पवार, अल्का सुरसे, भावना कदम, प्रिया सावंत, ज्योती सुरसे, माया सुरसे, सीमा बढे, आरती सावंत, जयश्री तुपकर, प्रकाश कदम, पराग कदम, आशिष जुनघरे, अजय जाधव, गीता लिमसे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.चौकाचौकात केली निदर्शनेआंदोलनांतर्गत मराठाबांधवांनी शहरात मोटारसायकल रॅली काढली. शहरातील बाजार भागासह रामनगर, रेलटोली, सिव्हील लाईन्स परिसर होत ही रॅली धरणे स्थळी पोहचली त्यानंतर समारोप केला. रॅली दरम्यान मराठा महिला व पुरूषांनी चौकाचौकांत नारेबाजी करीत आरक्षणाची मागणी केली. आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देत सर्वांना आरक्षण नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, आंदोलनात मराठा पुरूषांसह महिलांनीही पुढाकार घेत आरक्षणासाठी जोर लावला.