वादळ व पावसामुळे अनेक घरांची पडझड; वीज खंडित

By Admin | Updated: July 27, 2014 23:50 IST2014-07-27T23:50:50+5:302014-07-27T23:50:50+5:30

गेल्या दोन-तीन दिवसांच्या वादळी पावसामुळे कामठा अंतर्गत येणारे गाव खातिया, कामठा, लंबाटोला, पांजरा येथे अनेक घरे पडली आहेत.

Many homes collapse due to storms and rains; Power breaks | वादळ व पावसामुळे अनेक घरांची पडझड; वीज खंडित

वादळ व पावसामुळे अनेक घरांची पडझड; वीज खंडित

खातिया : गेल्या दोन-तीन दिवसांच्या वादळी पावसामुळे कामठा अंतर्गत येणारे गाव खातिया, कामठा, लंबाटोला, पांजरा येथे अनेक घरे पडली आहेत.
खातिया येथील तलाठी बोडखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खातिया येथील भुरा मेश्राम, खेलन बागडे, चैतराम सोलंकी यांची घरे पडली व अनेक लोकांच्या घरांच्या भिंतीत ही पावसाचे पाणी मुरले आहे. त्याचप्रकारे तलाठी डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंबाटोला येथील सात, कामठा येथील सात व पांजरा येथील तीन लोकांची नावे आतापर्यंत नुकसानग्रस्त म्हणून आली आहेत.
ज्यांची घरे पडली आहेत त्यांच्या घरांची पाहणी करून संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले. या क्षेत्रातील घरांच्या जवळील झाडे पडली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला असून पावसाच्या दिवसात नागरिकांना कंदील, दिवे व लालटेनच्या प्रकाशात रात्र काढावी लागत आहे.
तसेच गावाजवळील अनेक नाले, बोडी भरल्याणे लोकांनी बाहेर गावी जाणे बंद केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Many homes collapse due to storms and rains; Power breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.