The mantle of the plumbing work | नळ जोडणीच्या कामाचा श्रीगणेशा
नळ जोडणीच्या कामाचा श्रीगणेशा

ठळक मुद्देचार हजार जोडण्या देणार : नगर परिषदेची ‘घर तेथे नळ’ योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या ‘घर तेथे नळ’ योजनेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत मरारटोली परिसरातून नळ जोडणीच्या कामाचा श्रीगणेश करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत नगर परिषद गरजूंसाठी चार हजार नळ जोडणी नि:शुल्क देणार आहे.
अन्न, वस्त्र व निवारा या तीन जीवनावश्यक वस्तू असतानाच पाण्याशिवाय जीवनच जगता येणार नाही. अशात प्रत्येकालाचा पाण्याची गरज असून जेथे घर आहे तेथे पाण्याची गरज भासरणारच आहे. त्यात ज्यांच्या जवळ पैसे आहे त्यांचे ठीक आहे. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना मात्र मिळेल त्या पाण्यावरच निभावून घ्यावे लागते. अशात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ही निर्माण होतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन, नगर परिषदेने अशा गरजूंना नि:शुल्क नळ जोडणी देण्याचे ठरविले असून ‘घर तेथे नळ’ योजना ही योजना हाती घेतली आहे.यांतर्गत नगर परिषद शहरात चार हजार नि:शुल्क जोडण्या देणार आहे. १४ व्या वित्त आयोगातून ही योजना राबविली जाणार असून यांतर्गत नगर परिषदेत तीन हजार २०० अर्ज आले होते.सर्व प्रक्रिया पूर्ण करून याच महिन्यापासून नळ जोडणीच्या कामाला प्रभाग क्रमांक ५ मधील मरारटोली परिसरातून सुरूवात करण्यात आली. प्रभागाचे नगर परिषद सदस्य सचिन शेंडे यांनी मंजूर केलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जानुसार ही नळ जोडणी केली जात आहे.

Web Title: The mantle of the plumbing work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.