शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शहराची लाईफलाईन असलेल्या मानागड तलावात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

मानागड जलाशयातून कालव्याद्वारे एकूण १३३५ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. या जलाशयाची एकूण साठवण क्षमता ६.०५ दश लक्ष घनमीटर असून आता पावसाळा परतीच्या वाटेवर येत असतानासुद्धा जलाशयात आतापर्यंत १.३५ दशलक्ष घनमीटर पाणी संग्रहित झाले आहे. पाण्याचे एकूण साठवण क्षमता १९ टक्के असून त्यापैकी १७ टक्के साठा राखीव जलसाठा आहे. केवळ दोन टक्के पाणीच सोडण्यासाठी उपलब्ध आहे.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संपूर्ण सालेकसा शहराची ऐन गरजेच्यावेळी तहान भागविणारा व विविध उपयोगासाठी पाण्याचा पुरवठा करून देणारा मानागड मध्यम प्रकल्पात अजूनपर्यंत ठणठणाट असल्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सालेकसा शहराला भीषण पाणी टंचाईला द्यावे लागण्याची शक्यता आहे. जलाशय अंतर्गत ओलिताखाली येणाऱ्या शेतीला सुध्दा पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सालेकसापासून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या मानागड जलाशयातून एकूण १३ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा असून मधात सीतेपाला आणि हलबीटोला गावाला स्पर्श करीत पूर्वेकडून सालेकसा (आमगाव खुर्द) शहरात प्रवेश करतो. तालुका मुख्यालयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसराजवळून मुख्य कालवा वाहत असताना संपूर्ण शहराच्या अगदी मधोमध वाहत जाताना एकूण १३ कि.मी.चा प्रवास करत असतो. या मुख्य कालव्यातून एकूण २५ उपकालवे असून या उपकालव्याच्या माध्यमातूनसुद्धा शहराच्या प्रत्येक भागात विविध उपयोगी कामासाठी पाण्याची सोय उपलब्ध होत असते. पुढे शहराबाहेर परिसरातील धान पिकांना सिंचनासाठी हे सर्व कालवे जीवनदायिनी म्हणून काम करतात. मानागड जलाशयातून कालव्याद्वारे एकूण १३३५ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. या जलाशयाची एकूण साठवण क्षमता ६.०५ दश लक्ष घनमीटर असून आता पावसाळा परतीच्या वाटेवर येत असतानासुद्धा जलाशयात आतापर्यंत १.३५ दशलक्ष घनमीटर पाणी संग्रहित झाले आहे. पाण्याचे एकूण साठवण क्षमता १९ टक्के असून त्यापैकी १७ टक्के साठा राखीव जलसाठा आहे. केवळ दोन टक्के पाणीच सोडण्यासाठी उपलब्ध आहे. १३३५ हेक्टर पैकी  किमान ९०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला पाणी देणे बंधनकारक असते. पुढे पाऊस असाच राहिला तर एका पाण्यासाठी संकटात सापडलेल्या पिकांना सुद्धा पुरेशा पाणी देता येणार नाही. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातून गेलेल्या कालव्यात जेव्हा पाणी वाहत असते त्यावेळी लोकांची समस्या दूर तर होतेच सोबतच शहरातील विहीर बोअरवेलचीसुद्धा पाण्याची पातळी वाढत असते. त्यामुळे पाण्याची टंचाई आपोआप कमी होण्याला मदत  मिळत असते.

मुसळधार पावसाची प्रतीक्षापावसाचे तीन महिने सरले, तरी यंदा पाऊस सरासरी निम्म्याहून खालीच आहे. मागील तीन महिन्यात या तालुक्यात एकदाही मुसळधार पाऊस आला नाही. त्यामुळे कुठेही पाणीसाठा झालेला नाही. जेव्हा केव्हा पाऊस पडला फक्त रिपरिप किंवा सरवा स्वरूपाचा आला. यंदा एकदाही नदीनाले भरून वाहले नाही. अशात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण