हिवताप प्रतिबंध मोहीम, जनतेने खबरदारी घ्यावी
By Admin | Updated: July 29, 2016 01:48 IST2016-07-29T01:48:52+5:302016-07-29T01:48:52+5:30
जिल्ह्यात जुलै २०१६ मध्ये हिवताप या किटकजन्य आजारामध्ये वाढ झाल्याचे लक्षात येत आहे.

हिवताप प्रतिबंध मोहीम, जनतेने खबरदारी घ्यावी
गोंदिया : जिल्ह्यात जुलै २०१६ मध्ये हिवताप या किटकजन्य आजारामध्ये वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. याचे कारण नुकताच जिल्ह्यात पडलेला पाऊस. त्यामुळे या पर्जन्यकाळामध्ये किटकजन्य आजार उदा.हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकुनगुनिया आदी आजारांचा प्रसार डासांमार्फत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किटकजन्य आजाराला वेळीच प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हास्तरावरुन उपाययोजना करण्यात येणार आहे.
यात, प्रत्येक गावात गृहभेटीच्या माध्यमातून किटकजन्य आजाराबाबत नियमीत सर्वेक्षण विशेषत: यात जोखमीच्या गावांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गाव-टोला येथील डासोत्पत्ती स्थानांचा नायनाट करण्यासाठी रासायनिक प्रक्रियाद्वारे (जळलेले इंधन-वंगन टाकणे) अॅबेटचा वापर, जैविक प्रक्रिया (गप्पीमासे सोडणे) वापरात नसलेल्या डासोत्पत्ती स्थानांना कायमस्वरुपी नष्ट करणे. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, आरोग्य सहायक यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण तसेच किटक संहारक मार्फत किटकशास्त्रीय सर्वेक्षण करु न डासांच्या घनतेत वाढ असलेल्या ठिकाणी ताप-किटकजन्य आजार सर्वेक्षण करु न तातडीने उपाययोजना कराव्यात.
तसेच रक्त नमुने-रक्त जल नमुन्यांची स्थानिकस्तरावर तातडीने तपासणी करु न तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत औषधोपचार करावा. कोणताही ताप आल्यास शासकीय आरोग्य संस्थेत रक्तजल नमुन्याची तात्काळ हिवताप विषयक तपासणी करुन औषधोपचार करु न घ्यावा. संपूर्ण शरीर झाकेल असा पोषाख, झोपतांना डास प्रतिरोधक उपाययोजना उदा.मच्छरदानी, डास पळवून लावणारे द्रावण, अगरबत्तीचा वापर करावा. घरात व आसपासच्या परिसरामध्ये पाणी साचवून ठेवू नये, पाणी साचले असल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दयावे.
घरातील शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, पाण्याचे साठे दर सात दिवसांनी कोरडे करु न ठेवावे. घराच्या परिसरापासून खताचे खड्डे, उकिरडे किमान १०० मिटर दूर करावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)