लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसंदर्भात गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते व ओबीसीचे नेते बाबुराव कोहळे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने बुधवारी (दि.११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.देशात ३७४४ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याकरिता २०१२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा.अशी सर्व ओबीसी समाजाची जनभावना आहे.याबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन होणाºया जनगणनेत याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी खा. अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडे केली.शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, सुरेश राठोड उपस्थित होते.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST
देशात ३७४४ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याकरिता २०१२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा.अशी सर्व ओबीसी समाजाची जनभावना आहे.याबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन होणाºया जनगणनेत याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी खा. अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडे केली.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करा
ठळक मुद्देअशोक नेते यांची मागणी : पंतप्रधानांना दिले निवेदन