एकच नारा,सेवेत कायम करा
By Admin | Updated: October 16, 2016 00:33 IST2016-10-16T00:33:08+5:302016-10-16T00:33:08+5:30
अनेक वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासाठी १ हजार ८१४ कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.

एकच नारा,सेवेत कायम करा
एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे आंदोलन : जिल्ह्यातील १८१४ कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
गोंदिया : अनेक वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासाठी १ हजार ८१४ कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.
आंदोलनात वैद्यकीय अधिकारी ८५, औषधी निर्माण अधिकारी ३६, लॅब टेक्निशियन ३१, स्टॉफपरिचारीका ६०, एलएचव्ही १७, एएनएम २९२, इतर कर्मचारी ६५३, आशा गटप्रवर्तक ४६, आशा १११५ यांचा समावेश होता. एनएचएम सुरु होण्यापुर्वीची स्थिती २००५ नुसार संस्थेत प्रसूती ३९.१८ टक्के, जन्मदर १७.९५ टक्के, अर्भक मृत्यूदर ५४.४२ टक्के, उपजत मृत्यू दर २२.१७ टक्के, माता मृत्यू दर ०.९४ टक्के, घरी झालेल्या प्रसूती १२ हजार २९१ करण्यात आल्या. २०१५ नुसार संस्थेत प्रसूती ९९.७७ टक्के, जन्म दर १६.२८ टक्के, अर्भक मृत्यू दर १६.२६ टक्के, उपजत मृत्यू दर ९.७९ टक्के, माता मृत्यू दर ०.६९ टक्के, घरी झालेल्या प्रसुती ४५ टक्के आहेत. आंदोलनाचे नेतृत्व सुनिल तरोणे, जिल्हा व्यवस्थापक अर्चना वानखेडे, मनोज तिवारी, डॉ. मीना वट्टी, सपना खंडाईत, शैलेश तिवारी, डॉ. सत्येंद्र शुक्ला, सांकेत मोरघरे, संजय दोनोडे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)