मका उत्पादक शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST2021-07-28T04:30:12+5:302021-07-28T04:30:12+5:30

केशोरी : आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी संस्था केशोरीच्या आधारभूत खरेदी केंद्रावर रब्बी धान विकणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन ...

Maize growers wait for farmers to err | मका उत्पादक शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत

मका उत्पादक शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत

केशोरी : आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी संस्था केशोरीच्या आधारभूत खरेदी केंद्रावर रब्बी धान विकणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन या परिसरातील उन्हाळी मका उत्पादित शेतकऱ्यांचे मका पीक नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव या दोन आधारभूत खरेदी केंद्रांमार्फत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मका पिकाची खरेदी करण्यात आली. मात्र, एक महिन्याचा कालावधी लोटूनही आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या मका पिकाचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी धान पिकाला बगल देत उन्हाळी मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. आदिवासी विकास महामंडळाचे विविध कार्यकारी संस्था केशोरी अंतर्गत सुरू असलेल्या आधारभूत खरेदी केंद्रात धान खरेदी करण्याची गर्दी होत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना मका विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदीप्रमाणे नवेगावबांध आणि अर्जुनी मोरगाव येथील आधारभूत खरेदी केंद्र निश्चित केले. या दोन्ही आधारभूत खरेदी केंद्रांमधून एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांजवळील मका पिकाची खरेदी केली होती. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटूनही चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहेत.

..........

महामंडळाचे वेळकाढू धोरण

खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या तोंडावर असल्यामुळे या हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, औषधी, खते इत्यादींचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध यांनी खरेदी केलेल्या मका पिकाच्या हुंड्या विनाविलंबाने विभागीय आदिवासी विकास महामंडळाच्या भंडारा कार्यालयाकडे पाठविल्या. एक महिन्याचा कालावधी लोटूनही आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मका खरेदीचे चुकारे जमा केले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

.........

Web Title: Maize growers wait for farmers to err