जमीन व मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:01+5:302021-02-05T07:44:01+5:30
नवेगावबांध : सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमीन सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला बाहेर ...

जमीन व मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा
नवेगावबांध : सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमीन सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला बाहेर काढण्यासाठी सेंद्रिय शेतीचे आपरेशन मोठ्या प्रमाणात करावे लागेल, असे परखड विचार सेंद्रिय शेतीचे समर्थक देवेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.
कृषी विभागामार्फत आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन २०२०-२१ जमीन आरोग्यपत्रिकांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आसोली येथील आयोजित दुसऱ्या शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच यादवराव मसराम होते. प्रमुख वक्ते म्हणून ललित सोनवाणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, दुधराम नाकाडे, दयाराम काळसर्पे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, नरेश बोरकर उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरखडे यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार नाही, आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही. नगदी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात, असे प्रतिपादन केले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया विकास योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना व गट शेती याबाबत सविस्तर माहिती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी दिली. माती नमुना रोग त्यावरील नियंत्रण गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्त्व प्रास्ताविकातून पंकज सूर्यवंशी यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्यासह कृषी सहायक विश्वनाथ कवासे, चिंतामण मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी कृषिमित्र गुरुदेव आकरे, भोजराम नाकाडे, पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, राजन गणवीर यांनी सहकार्य केले.