प्रियकराच्या घरी प्रेयसीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 00:26 IST2016-09-18T00:26:12+5:302016-09-18T00:26:12+5:30

एखाद्या सिनेमातील दृष्य आठवावे अशी घटना गोरेगाव तालुक्याच्या बाम्हणी येथे शुक्रवारी घडली.

Lover of poison | प्रियकराच्या घरी प्रेयसीने घेतले विष

प्रियकराच्या घरी प्रेयसीने घेतले विष

कुऱ्हाडीतील युवती : बाम्हणीतील युवकाशी प्रेम
गोंदिया : एखाद्या सिनेमातील दृष्य आठवावे अशी घटना गोरेगाव तालुक्याच्या बाम्हणी येथे शुक्रवारी घडली. प्रियकर सोडून गेल्याने निराश झालेल्या एका प्रेयसीने त्याच्या घरी जाऊन उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, कुऱ्हाडी येथील ३० वर्षाची युवती मागील चार महिन्यापासून पुणे येथे वास्तव्यास आहे. तिथे ती एका कंपनीत ती नोकरीला आहे. पुण्यात दुसऱ्या एका कंपनीत नोकरीवर असलेल्या गोरेगाव तालुक्याच्या बाम्हणी (चोपा) येथील प्रकाश भोजराज बोरकर याच्यासोबत मागील एक वर्षापासून तिचे प्रेमसंबंध आहेत.
ईदच्या एक दिवसापूर्र्वी दोघेही गोंदियाला आले होते. पारस लॉजमध्ये दोन दिवस थांबले. तेथूनच ते पुण्याला परत जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यात वाद झाला. वादानंतर प्रकाश बोरकर आपला मित्र बडगे याच्यासोबत गेला होता. निराश झालेल्या प्रियकरच्या शोधात ती युवती गेली. परंतु तो न भेटल्यामुळे तिने गोरगाव पोलिसात तक्रार केली. यानंतर बाम्हणी येथील प्रियकर प्रकाश यांच्या घरी ती गेली. आपल्या प्रेमाची कथा प्रियकराच्या आई-वडीलांना सांगितली. तिने प्रियकराच्या नातेवाईकांना सांगूनही तिला तिचा प्रियकर मिळत नसल्याचे लक्षात येताच गोंदियातून उंदीर मारण्याचे औषध नेऊन १६ सप्टेंबरला तिने प्रियकराच्या घरी जाऊन ते प्राशन केले.
तिची प्रकृती खालावल्यावर प्रथम गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार करून केटीएस रुग्णालयात नेण्यात आले. तिला अजूनही आपल्या प्रियकराची प्रतीक्षा आहे.

Web Title: Lover of poison