टोळधाडीचे पुन्हा मध्य प्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:59+5:30

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांची पेरणीची कामे सुध्दा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीची कामे लांबली होती. मात्र शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करुन ती कामे वेळेत पूर्ण केली.

Locust trail again towards Madhya Pradesh | टोळधाडीचे पुन्हा मध्य प्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण

टोळधाडीचे पुन्हा मध्य प्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे फवारणी सुरू : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारामार्गे गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात टोळधाड दाखल झाली होती.त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा कृषी विभागाने टोळधाडीला परतावून लावण्यासाठी अग्नीशमन बंबाव्दारे फवारणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे टोळधाडीने पुन्हा मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकट तूर्तास टळले आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांची पेरणीची कामे सुध्दा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीची कामे लांबली होती. मात्र शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करुन ती कामे वेळेत पूर्ण केली. पण दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातून टोळधाड गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली.
या टोळधाडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाला. टोळधाडीच्या थव्यांमुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टोळधाड ही पिके पूर्णपणे फस्त करीत असल्याने पेरणी केलेल्या धानाच्या पºहांना याचा फटका बसला तर दुबार पेरणी करावी लागेल अशी चिंता शेतकºयांना सतावित होती. जिल्ह्यातून टोळधाडीला परतावून लावण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सुध्दा याची वेळीच दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. रविवारी तिरोडा तालुक्यातील काही गावातील शेतीच्या परिसरात अग्निशमन बंबाव्दारे फवारणी करुन टोळधाड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर सोमवारी (दि.१५) गोंदिया तालुक्यातील रावणवाडी, वडेगाव (बंध्या) परिसरात ड्रोनव्दारे झाडांवर किटकनाशकाची फवारणी करुन टोळधाडीला परतावून लावण्यात आले.
जिल्ह्यातील ८० टक्के टोळधाड नियंत्रणात आली असून आता टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. टोळधाडीला परतावून लावण्यासाठी शेतकºयांनी शेतात ट्रॅक्टरने आवाज तसेच धूर करण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहे. शेतकरी सुध्दा टोळधाडीला परतावून लावण्यासाठी उपाययोजना करीत असल्याचे चित्र आहे.

झाडांवर फवारणी करण्यासाठी ड्रोनची मदत
टोळधाड ही प्रामुख्याने शेताच्या परिसरातील झाडांवर बसलेली असते. मात्र साध्या फवारणी पंपाव्दारे फवारणी करता येत नसल्याने सोमवारी (दि.१५) कृषी विभागाने ड्रोनच्या मदतीने गोंदिया तालुक्यातील वडेगाव(बंध्या) परिसरातील झाडांवर किटकनाशकांची फवारणी करुन टोळधाड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यातून टोळधाडीला परतावून लावण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. ८० टक्के टोळधाड आटोक्यात आली असून टोळधाडीच्या थव्यांनी आता मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील टोळधाडीचे संकट तूर्तास टळले आहे. तसेच कृषी विभागाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे.
-गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Web Title: Locust trail again towards Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती