शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

By Admin | Updated: December 31, 2014 23:26 IST2014-12-31T23:26:13+5:302014-12-31T23:26:13+5:30

पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या ग्राम मुरपार (पुराळा) येथे शाळेला शिक्षक देण्यात यावे, म्हणून शाळेला कुलूप ठोकुन शिक्षण विभागाचा निशेध नोंदविला.

Locked by villagers for demanding teachers | शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

बिजेपार : पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या ग्राम मुरपार (पुराळा) येथे शाळेला शिक्षक देण्यात यावे, म्हणून शाळेला कुलूप ठोकुन शिक्षण विभागाचा निशेध नोंदविला.
मुरपार येथे जि.प. ची वर्ग १ ते ६ पर्यंतची शाळा आहे. इथे एकूण सध्या चार शिक्षक कार्यरत आहेत. याच शाळेतील एक सहायक शिक्षक आर.एम. कडव यांना तात्पुर्ती बदली निमित्त जी.प. शाळा सुरतोली येथे पाठविण्यात आले आहे.
याच शाळेतील उच्चश्रेणी मुख्याध्यापक जे.एम. टेंभरे यांना पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखल त्यांना अतिरिक्त ठरवून त्यांची बदली प.सं. आमगावच्या ननसरी येथील शाळेत करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांची संख्या कमी झाली व त्यांचा विपरीत परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तात्पुरती बदली झालेल्या कडव या शिक्षकांना त्वरीत मुरपार शाळेत परत पाठवा म्हणून गटशिक्षाधिकारी, शिक्षणाधिकारी बीडीओ, मुख्यकार्यपालन अधिकारी यांना वारंवार निवेदन देवून ही समस्या हल हात असल्याचे पाहून शेवटी नाईलाजाने गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक येईपर्यंत शाळेलाच कुलुप ठोकण्याचा निर्णय घेवून दि. २९ डिसेंबरला शाळेला कुलूप ठोकलेले आहे. जोपर्यंत शिक्षक देणार नाही तोपर्यंत शाळेत मुले पाठविणार नाही. असा पवित्रा गावकऱ्यांनी सध्या घेतला आहे.
मुरपाट या गावाला लागून पुराडा येथील आमदार व महिला बाल कल्याण समिती सभापती असून सुद्धा आम्हाला साधा शिक्षक मिळत नाही. याची खंत सुद्धा गावकऱ्यांनी बोलून दाखविले आहे.
यावर संबंधित विभाग आणि अधिकारी किती लवकर तोडगा काढतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Locked by villagers for demanding teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.