‘लॉकडाऊन’मुळे वाजंत्री व्यावसायीकांवर उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:07+5:30

वाजंत्री व्यावसायीकांना शासनाच्या योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये १३ टक्के निधी मिळतो. यापैकी ६ टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश असतो. यापैकी काही निधी वैयक्तीक लाभाच्या योजनांवर सुद्धा खर्च केला जातो. जिल्हा परिषदेला स्वत:च्या निधीतून २० टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार आहे.

‘Lockdown’ starves instrumentalists | ‘लॉकडाऊन’मुळे वाजंत्री व्यावसायीकांवर उपासमार

‘लॉकडाऊन’मुळे वाजंत्री व्यावसायीकांवर उपासमार

ठळक मुद्देप्रती कुटुंब १० हजारांची मदत द्या : जिल्हा परिषदने करावी मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देश आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी मागील २२ मार्चपासून देशभरात ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना बसत आहे. तर विवाह समारंभांसह इतर सर्व कार्यक्रम रद्द केल्याने वाजंत्री व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदा दिवाळीपूर्वी विवाहाचा मुहूर्त निघणे कोरोनामुळे कठीण आहे. त्यामुळे वाजंत्री व्यावसायीकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
वाजंत्री व्यावसायीकांना शासनाच्या योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये १३ टक्के निधी मिळतो. यापैकी ६ टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश असतो. यापैकी काही निधी वैयक्तीक लाभाच्या योजनांवर सुद्धा खर्च केला जातो. जिल्हा परिषदेला स्वत:च्या निधीतून २० टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मुळे वाजंत्री व्यावसायीकांवर आलेले उपासमारीचे संकट लक्षात घेता जिल्हा परिषदेने स्वत:च्या निधीतून जिल्ह्यातील वाजंत्री व्यावसायीकांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करावी. तसेच सामाजिक न्याय विभागाने सुद्धा यासाठी हातभार लावावा अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
‘लॉकडाऊन’मुळे सर्व नियोजित विवाह सोहळे आणि इतर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा वाजंत्री व्यावसायीकांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. कोरोनाचे संकट पुन्हा किती दिवस राहते हे अद्याप सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे तोपर्यंत वाजंत्री व्यावसायीकांच्या कुटुंबीयांची परवड होवू नये यासाठी शासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत केल्यास त्यांना मोठा आधार मिळू शकेल.

Web Title: ‘Lockdown’ starves instrumentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.