शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

नवेगावबांध : ज्या गावात कोरोना रुग्ण नाहीत, अशा गावात लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक व इतर ...

नवेगावबांध : ज्या गावात कोरोना रुग्ण नाहीत, अशा गावात लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक व इतर वस्तूची दुकाने पूर्ववत सुरू करावी. यासाठी स्थानिक प्रशासनाचा अहवाल मागविण्यात यावा व गरज नसेल तर अशा गावात लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे. भाववाढ किंवा व्यापाऱ्यांकडून केली जाणारी वस्तूंची कृत्रिम टंचाई संपुष्टात आणण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन आता मेटाकुटीला आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच इतर वस्तू जास्त भावाने विक्री करून सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार दिवसेंदिवस बळावत आहे. अत्यावश्यक सेवा वगळून किंवा ज्यांना सकाळी सात वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्या व्यतिरिक्त इतर दुकाने सुद्धा परवानगी नसताना देखील खुलेआम विक्री करीत आहेत. गरजू ग्राहकांना वाजवीपेक्षा अधिक दराने अशा वेळी वस्तू नाइलाजाने खरेदी करावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे आर्थिक शोषण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सध्या सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. भाववाढीवर नियंत्रण करणारी कुठलीही शासकीय यंत्रणा सध्या दिसत नाही. मागील वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला अन्न व औषधी प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तूंची जादा दराने विक्री होते काय? हे प्रत्यक्ष या विभागाचे कर्मचारी व अधिकारी शहानिशा करीत असत; परंतु आज असली कुठलीही यंत्रणा सध्या कार्यरत नाही. त्यामुळे काळाबाजार व जादा भावाने विक्री सर्रासपणे सुरू आहे.

....

अनेकांचा रोजगार बुडाला

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता मजुरी व रोजगाराला मुकली आहे. आर्थिकदृष्ट्या लोक दिवसेंदिवस लॉकडाऊनच्या काळात अधिकाधिक कंगाल होत आहेत. अधिक दराने किराणा, भाजीपाला व इतर वस्तू दुकानदार जास्त भावाने वैध-अवैधरीत्या विक्री करीत आहेत. यांच्यावर अंकुश कोण ठेवणार, की लॉकडाऊनच्या नावावर लोकांचे आर्थिक शोषण सुरू राहणार, याचे उत्तर लोकप्रतिनिधी व प्रशासन देईल काय, असा प्रश्न आर्थिक शोषणास बळी पडणारे करीत आहेत.