‘त्या’ मुलाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा

By Admin | Updated: May 25, 2015 01:11 IST2015-05-25T01:11:11+5:302015-05-25T01:11:11+5:30

प्रशिक्षणादरम्यान स्विमींग पूलमध्ये बुडालेल्या त्या मुलावर नागपूरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा असल्याचे कुटुंबीयांकडून कळले.

'That' a little improvement in the child's health | ‘त्या’ मुलाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा

‘त्या’ मुलाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा

उपचार सुरू : डॉक्टरांनी दिली ७२ तासांची वेळ
गोंदिया : प्रशिक्षणादरम्यान स्विमींग पूलमध्ये बुडालेल्या त्या मुलावर नागपूरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा असल्याचे कुटुंबीयांकडून कळले. डॉक्टरांनी ७२ तासांची वेळ दिली असून त्यानंतरच प्रकृतीबद्दल स्पष्ट होणार आहे.
येथील साकेत पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्विमींगच्या प्रशिक्षणादरम्यान छगन मंगलप्रसाद मेश्राम (१७) हा शनिवारी सकाळी ७.३० वाजता दरम्यान स्विमींग पूलमध्ये बुडाला होता. यात त्याची प्रकृती गंभीर असल्याने लगेच त्याला गोंदिया हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. मात्र तेथे त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा दिसून येत नसल्याने सायंकाळी ७ वाजता दरम्यान कुटुंबीयांनी त्याला नागपूरला हलविले. तर रात्री १०.३० वाजता दरम्यान नागपूरच्या वर्धा रोड स्थित श्रीकृष्ण हॉस्पीटलमध्ये त्याला उपचारार्थ भरती करण्यात आले.
छगनच्या प्रकृतीबाबत त्याच्या कुटुंबीयांकडे विचारणा केली असता त्यांनी थोडीफार सुधारणा दिसून येत असल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांनी ७२ तासांची वेळ दिली असून त्यानंतर काय ते स्पष्ट होणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे अद्याप तरी छगनच्या प्रकृतीबद्दल काहीच स्पष्ट झाले नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 'That' a little improvement in the child's health