साक्षरता दिवस साजरा
By Admin | Updated: September 12, 2015 01:42 IST2015-09-12T01:42:29+5:302015-09-12T01:42:29+5:30
येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागाद्वारे

साक्षरता दिवस साजरा
गोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागाद्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.८) जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. आनंद मोरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गुणवंत गाडेकर, डॉ. धारणा टेेंभरे, डॉ. शितल जुनेजा आणि प्रा. माधुरी राजे उपस्थित होते. प्रा. मोरे यांनी, देशाचा विकास शिक्षणाच्या माध्यमानेच होऊ शकतो. असे म्हणत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच निरक्षर लोकांना साक्षर करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. डॉ. गाडेकर यांनी, शिक्षण घेण्याचा अधिकारी सर्व लोकांचा आहे आणि शिक्षण घेऊनच व्यक्ति आपली आणि देशाची प्रगती करु शकतो असे म्हटले.
विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांकरीता भितीचित्र (पोस्टर) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सची प्रदर्शनी लावण्यात आली व त्याचे उद्घाटन प्रा. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धेत रुची बन्सोड हिने प्रथम पुरस्कार पटकाविला. सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीचे अवलोकन केले. प्रास्ताविक राहुल बिसेन यांनी मांडले. संचालन राहुल गोबरेले यांनी केले. आभार शुभम अवस्थी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)