शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराकडून होतेय लाखोंची वीज चोरी

By admin | Updated: May 9, 2015 01:32 IST

जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत गावात नळ योजनेचे काम सुरु असून यात कंत्राटदार डायरेक्ट हुक लावून वीज चोरी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काचेवानी : जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत गावात नळ योजनेचे काम सुरु असून यात कंत्राटदार डायरेक्ट हुक लावून वीज चोरी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी व सहायक अभियंत्यांना माहिती देण्यात आली. मात्र यावर त्यांनी वीज चोरी पकडण््याचे अधिकार आमच्याकडे नसल्याचे सांगत हात झटकले. गरीबाने वीज चोरी केल्यास लाईनमन पासून अधिकाऱ्यांची त्याकडे नजर असते. मात्र धनाढ्य व्यक्ती कितीही चोरी करीत असेल तरी त्यांच्याकडे लक्ष असूनही दुर्लक्ष केले जाते. अशीच स्थिती मजीतपूर, डोंगरगाव, एकोडी, काचेवानी आणि गंगाझरी येथे पहायला मिळाली.या गावांत जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत नळ योजनेच्या पाईपलाईन करीता लोखंड कापण्याची मशिन (कटर) चालवणे, साचलेले पाणी काढण्याकरीता मोटारचा उपयोग करणे, नळ फिटिंग करीता मशिन द्वारे जमिनीचे खोदकाम करणे अशा विविध कामे सुरू असून यासाठी खांबावर हूक लावून कंत्राटदाराद्वारे विज चोरी केली जात आहे. सुरू असलेल्या या प्रकाराबाबत उपकार्यकारी अभियंता व सहायक अभियंता गंगाझरी यांना माहिती देण्यात आली. मात्र चोरी प्रकरण पकडण्याचे अधिकार आपल्याकडे नसून स्वतंत्र यंत्रणा भरारी पथक आहे. त्यांना माहिती देण्यात यावी, असे बेजबाबदारपणाचे उत्तरे देण्यात आल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले. पंथरा दिवस लोटले परंतू कोणत्याही अधिकाऱ्यांनी वास्तविकता पाहण्याचा प्रयत्न केलेला नाही. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोरीला प्रोत्साहन दिल्याचे यावरुन स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)