लायंस क्लब गोंदिया संजिवनीची बैठक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:42+5:302021-03-04T04:54:42+5:30

क्लब अध्यक्ष योजना कोतवाल यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला ॲड.खंडेलवाल व यांच्या पत्नी रीतू खंडेलवाल, डीजी कोऑर्डिनेटर अवनिकांत ...

Lions Club Gondia Sanjivani meeting in excitement | लायंस क्लब गोंदिया संजिवनीची बैठक उत्साहात

लायंस क्लब गोंदिया संजिवनीची बैठक उत्साहात

क्लब अध्यक्ष योजना कोतवाल यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला ॲड.खंडेलवाल व यांच्या पत्नी रीतू खंडेलवाल, डीजी कोऑर्डिनेटर अवनिकांत शर्मा, रीजन चेयरपर्सन दीपक कदम, झोन चेयरपर्सन राजेश्वर कनोजिया प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी योजना कोतवाल, सचिव बरखा कनोजिया व कोषाध्यक्ष प्रेम शर्मा यांनी क्लबकडून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी राजेश कनोजिया, राजेश्वर कनोजिया व सविता तुरकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले. संचालन राजेश कनोजिया यांनी केले. आभार राकेश तुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला माजी प्रांतपाल सीए. विनोद जैन, उपाध्यक्ष सुधा जैन, ललित शर्मा, मोहन कोतवाल, प्रेम तीर्थानी, आत्माराम दसरे, अनामिका शेंडे, पूजा सोनटक्के, आदित्य जैन, डॉ.शारदा राऊत, अमोल पाटील, सविता पाटील, वंदना शर्मा व क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Lions Club Gondia Sanjivani meeting in excitement