सामान्य व्यक्तींमध्ये विचारांची ज्योत पेटवा

By Admin | Updated: November 5, 2016 01:20 IST2016-11-05T01:20:51+5:302016-11-05T01:20:51+5:30

वृंदावनधाम येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा यज्ञात पहल्या दिवशी साध्वी ऋतंभरादेवी म्हणाल्या संस्काराच्या कमतरतेमुळे मर्यादा ओलांडली जात आहे.

Light up the thoughts of common people | सामान्य व्यक्तींमध्ये विचारांची ज्योत पेटवा

सामान्य व्यक्तींमध्ये विचारांची ज्योत पेटवा

साध्वी ऋतंभरा : जीवनाला ओळखण्याचे आवाहन
वृृंदावनधाम (गोंदिया) : वृंदावनधाम येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा यज्ञात पहल्या दिवशी साध्वी ऋतंभरादेवी म्हणाल्या संस्काराच्या कमतरतेमुळे मर्यादा ओलांडली जात आहे. शिकलेली व्यक्तीही अंधकाराय वावरत आहे. या अंधकाराला नष्ट करण्यासाठी सामान्य व्यक्तींमध्ये विचारांची ज्योत पेटविणे आवश्यक आहे. जीवन काय आहे हे ओळखने आवश्यक असल्याचे उदगार त्यांनी काढले.
ऋतंभरादेवी यांनी कथेचा शुभारंभ करताना तानसेन व त्यांचे गुरू हरिदास महाराज यांची कथा सांगितली. त्या म्हणाल्या, तानसेन महान कलाकार होते. त्यांचे गुरू हरिदास महाराज रात्रीला एकांतात संगीताचे वादन व गायन करीत होते. आधी तानसेन स्वत:ला सर्वश्रेष्ठ संगीतकार समजत होते. परंतु गुरूला ऐकल्यावर ते फक्त संगीत ची आराधना करीत आहेत असे म्हणत होते. संस्काराची गोष्ट करताना त्या म्हणाल्या आम्हाला देवीच्या प्रकोपाला का सामोरे जावे लागते. केदारनाथ मध्ये भीषण जलप्रलय झाला. नेपाळ उध्वस्त झाला. जापान, अमेरिका इतक्या प्रगतीनंतरही दैवी प्रकृतीच्या समोर उभा राहू शकत नाही. त्या वेदनामय स्वरात म्हणाल्या, आता पाच वर्षाच्या मुलीलाही सोडले जात नाही किंवा ७० वर्षाच्या वृध्दावर दया दाखविली जात नाही. आपल्या धार्मिक देशातही दर २२ मीनीटाला बलात्कार होतात.
ज्ञानाचा प्रकाश मनाच्या आत बसायला हवा. स्वत:ला ज्ञानवान समण्यिापेक्षा अज्ञान बनून योग्य ज्ञान मिळवायला हवे. कथेच्या माध्यमातून त्या म्हणाल्या काही मिळवायचे असेल तर प्याला खाली असायला हवा. तेव्हाच त्यात अमृत भरेल.आम्ही झोपडीतही स्वर्ग पाहीला आहे. प्रेम व नाते यांना सांभाळणे हे स्वर्गाचे प्रतिक आहे.
कथेत खा. नाना पटोले, मध्यप्रदेशचे कृषि मंत्री गौरीशंकर बिसेन, खा. बोधसिंह भगत, वर्षा पटेल, मध्यप्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष लता एलकर, बालाघाट भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश रंगलानी, वाराशिवनीचे आ. डॉ.योगेंद्र निर्मल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Light up the thoughts of common people