आजपासून लाईफ चेंजिंग कार्यशाळा
By Admin | Updated: July 17, 2014 00:11 IST2014-07-17T00:11:13+5:302014-07-17T00:11:13+5:30
लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेंट्सच्या संयुक्तवतीने आज (दि.१७) पासून डी.बी.सायंस महाविद्यालय ‘लाईफ चेंजींग वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून लाईफ चेंजिंग कार्यशाळा
गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेंट्सच्या संयुक्तवतीने आज (दि.१७) पासून डी.बी.सायंस महाविद्यालय ‘लाईफ चेंजींग वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले आहे.
आज आधुनीक तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात कौशल्यपूर्ण ज्ञानाचा वापर गरजेचे झाले आहे. तांत्रीक कौशल्य न वापरता इतर अनेक कौशल्यांचीही जोड देण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांपुढे अभ्यासाचे वाढलेले ताण असून क्षुल्लक कारणांमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर होणारा परिणाम यामुळे आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आयुष्याबद्दल नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे.
म्हणून आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हातभार लावण्याकरिता स्वप्न आणि ध्येय समजून घेण्यासाठी या लाईक चेंजींग वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त वक्ते, लेखक व प्रशिक्षक नदीम काजी हे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, यश संपादनाच्या सवयी कशा अंगीकाराव्या, जिवनशैली कशी उंचवावी तसेच स्वप्न व ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रभावी टिप्स देतील. सोबतच आपल्या मनातील भिती दुर करण्याकरिता चक्क काचांवर चालण्याचे प्रशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी दोन हजार रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी ८८८८८७७३६४, ९८८१०११८२१ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(शहर प्रतिनिधी)