शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्सची मुदत संपली,अपाॅईंटमेंट घेतली काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

लायन्सचे नुतनीकरण झाले नाही तर नवीन लायन्सस तर काढावे लागणार का असा प्रश्न सुध्दा वाहन चालकांसमोर निर्माण झाला होता. अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षी मार्चनंतर लायन्सस नुतनीकरणाची मुदत संपलेल्या सर्व लायन्ससधारकांना नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो लायन्सस धारकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय : वाहन चालकांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांचे वाहन चालविण्याचे लायन्ससेसचे नुतनीकरण करण्याचे राहून गेेले. त्यामुळे आता पुढे काय अशी चिंता वाहन चालकांना सतावित होती. लायन्सचे नुतनीकरण झाले नाही तर नवीन लायन्सस तर काढावे लागणार का असा प्रश्न सुध्दा वाहन चालकांसमोर निर्माण झाला होता. अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षी मार्चनंतर लायन्सस नुतनीकरणाची मुदत संपलेल्या सर्व लायन्ससधारकांना नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो लायन्सस धारकांना दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने लायन्सस नुतनीकरणासाठी जाताना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची अपाइंटमेंट घेऊन जावे लागणार आहे. तशी सोय देखील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करुन दिली आहे. अपाइंटमेंट घेऊन गेल्यास वाहनचालकांची गैरसोय होणार नाही. लायन्स नुतनीकरणासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी लायन्सस नुतनीकरणाला येणाऱ्यांसाठी कोटा देखील निश्चित करुन दिला आहे. 

अशी घ्या अपाॅईंटमेंट उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने लायन्सस नुतनीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ज्या दिवशी लायन्सस नोंदणी करण्यासाठी जायचे आहे. त्या तारखेवर सिलेक्ट करुन आणि दिलेल्या वेळेत कार्यालयात पोहचून लायन्ससचे नुतनीकरण करता येणार आहे. 

असा आहे कोटालायन्सस नुतनीकरणासाठी उपप्रादेशिक कार्यालयात येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाने दररोज ६० लायन्सस नुतनीकरणाचा कोटा निश्चित केला आहे. गर्दी वाढल्यास कोट्यात अधिक वाढ केली जाणार आहे. कार्यालयात येणाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहन चालकांच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

पहिल्या दोन दिवसात केवळ २५ वाहनांची नोदणी गोंदिया जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश असल्याने साेमवारपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले. त्यामुळे पहिल्याच दिवशी दहा आणि आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी १५ वाहनांची नोंदणी झाली आहे. सर्व वाहनांचे शोरुम जवळपास दोन महिने बंद होते. त्यामुळे वाहनांची विक्री झाली नसल्याने नोंदणीसाठी प्रकरणे वाढली नाही. येत्या तीन चार दिवसात यात वाढ होऊ शकते. 

ज्या वाहन चालकांचे मागील वर्षीपासून लायन्सस नुतनीकरण करायचे राहिले आहे. त्यांना लायन्सस नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास कोटा पण वाढवून देण्यात येणार आहे. - विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस