जनमैत्रीमुळे गुन्ह्यांवर बसणार आळा

By Admin | Updated: September 2, 2014 23:52 IST2014-09-02T23:52:29+5:302014-09-02T23:52:29+5:30

पोलीस विभाग व लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने जनमैत्रीची स्थापना करण्यात आली. जनमैत्रीच्या स्थापनेमुळे पोलीस व जनता यांच्यात मधूर संबंध स्थापित होतील. आता वाढत्या गुन्ह्यांवर

Let's sit on the streets due to the Janmity | जनमैत्रीमुळे गुन्ह्यांवर बसणार आळा

जनमैत्रीमुळे गुन्ह्यांवर बसणार आळा

गोंदिया : पोलीस विभाग व लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने जनमैत्रीची स्थापना करण्यात आली. जनमैत्रीच्या स्थापनेमुळे पोलीस व जनता यांच्यात मधूर संबंध स्थापित होतील. आता वाढत्या गुन्ह्यांवर आळा बसविण्यासाठी पोलीस सामान्य जनतेला मित्र बनवेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केले.
या जनमैत्रीच्या स्थापनेमुळे सामान्य जनता गुन्ह्याशी संबंधित माहिती सरळ पोलिसांना देवू शकेल. जनतेला योग्य न्याय मिळेल तर पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात चांगली निर्माण होईल. जनमैत्रीच्या पुढाकाराने पोलिसांची भीती जनतेच्या मनातून दूर होईल व दोघांत मैत्री वाढेल. नखाते यांच्यानुसार, पोलीस मैत्रीच्या सदस्यांना ओळखपत्रही दिले जाईल. गुन्ह्याची माहिती देणारे व गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले जाईल.
लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल पोलिसांच्या सहकार्याने आठ ठिकाणी होर्डिंग्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या होर्डिंग्सवर सामान्य जनतेसाठी गुन्ह्यापासून सुरक्षा व सतर्कता बाळगण्याचे उपाय लिहिले आहेत. तसेच कोणत्याही घटनेची माहिती देण्यासाठी मोबाईल नंबरही देण्यात आले आहेत.
शहरातील पहिल्या होर्डिंग्सचा अनावरण जयस्तंभ चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नागपूरचे राजीव खंडेलवाल, चेतन मारवाह, हेमंत आडगावकर, कालुराम अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदिया रॉयलचे अध्यक्ष निखील अग्रवाल, अनिष गुप्ता, राहुल अग्रवाल, सुमीत गुप्ता, रोहीत गुप्ता, दिलप्रीत होरा, सुमीत अग्रवाल उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, सदगीर व वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अशोक अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Let's sit on the streets due to the Janmity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.