काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!
By Admin | Updated: January 1, 2015 23:03 IST2015-01-01T23:03:19+5:302015-01-01T23:03:19+5:30
२०१४ चा अंत झाला असून २०१५ या नववर्षाचा पहिला दिवस उजाडला आहे. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख, समाधानाचे जावे यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या

काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!
देवाला साकडे : सर्व धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी
गोंदिया : २०१४ चा अंत झाला असून २०१५ या नववर्षाचा पहिला दिवस उजाडला आहे. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख, समाधानाचे जावे यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी दिसून आली.
मागील वर्षात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. मुख्य म्हणजे देशातील आतंकवादी हल्ले, गुन्हेगारी, खून, अत्याचार यासारख्या घटनांनी मागचे वर्ष गाजले व कलंकितही झाले. सोबतच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे वाढलेला त्रास ही सर्व देशावरची संकटे आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात यंदा झालेला कमी पाऊस व त्यामुळे हातून गेलेले पीक , अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला.
एकंदर मागील वर्षात रोज काही ना काही ऐकायला आले. मात्र २०१५ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून हे वर्ष कुशल, मंगल झाले पाहीजे अशीच सर्वांची मागणी आहे. आपली ही मागणी देवापुडे मांडण्यासाठी गुरूवारी (दि.१) नागरिकांनी मंदिरात, मस्जीद, गुरूद्वारे व चर्चमध्ये जाऊन आपापल्या प्रार्थना पद्धतीनुसार देवाला साकडे घातले. (शहर प्रतिनिधी)