शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:24 IST

अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे४९३ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड : जिल्ह्यातील विविध उद्योगात संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे.विद्यार्थ्यांचा हा भ्रम दूर करुन त्यांना व्यावसायीक क्षेत्रातील नवीन बदलाचे धडे व प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेता यावा, यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाने पुढाकार घेतला आहे.यासाठी जिल्ह्यातील उद्योजक आणि शासकीय विभागांची मदत घेतली जात आहे.अभियांत्रिकी,स्थापत्य तसेच तंत्रनिकेतन विद्यालयाचा डिप्लोमा असून देखील या विद्यार्थ्यांवर बेरोजगार राहण्याची अथवा पाच ते दहा हजार रुपयांच्या वेतनावर काम करावे लागते. तर आयटी क्षेत्रात दररोज नवे बदल आणि संशोधन केले जात आहे. या नवीन बदलांना जे आत्मसात करीत आहेत त्यांचा जॉब सुरक्षीत आहे. मात्र जे आत्मसात करु शकले नाही त्यांना नौकरी गमवावी लागत आहे. हीच बाब हेरून महाराष्टÑ राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळाने तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्थानिक उद्योगांमध्ये व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मंडळाच्या सूचनेनुसार हब अ‍ॅन्ड स्पोकच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात याची सुरुवात करण्यात आली आहे.जिल्ह्यातील चार शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील विविध उद्योग आणि शासकीय विभागात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातंर्गत शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.गोडघाटे यांनी ४९३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना विविध उद्योगाच्या ठिकाणी सहा आठवड्याचे व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.१४ विभागांची समन्वय समितीजिल्ह्यात अदानी विद्युत प्रकल्पासह येथील एमआयडीसीमध्ये विविध उद्योग आहे. या उद्योगांमध्ये तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ६ आठवड्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सिंचन, बांधकाम व इतर विभागांची सुध्दा यासाठी मदत घेतली जात आहे.प्राचार्य सी.डी.गोडघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विभागाच्या सदस्यांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.अदानीचे स्टेशन हेड सी.पी.साहू हे या समितीचे सदस्य सचिव आहे.तंत्रनिकेनत विद्यालयातून विद्यार्थी डिप्लोमा घेवून बाहेर पडल्यानंतर त्यांना रोजगार मिळण्याची व अनुभवाची कमरता जाणवू नये तसेच व्यावसायीक क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांची माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना सहा आठवड्याचे व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.- सी.डी.गोडघाटेप्राचार्य तंत्रनिकेतन विद्यालय गोंदिया.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण