त्या बिबट्याची करंट लावून केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:06+5:30

आपल्या साथीदारांसह बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे व अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली. अशी माहिती सूत्रांनी दिली. बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध  पोलिसांनी  दिनांक १८ नोव्हेंबरला रात्री अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविला आहे. या तिन्ही  आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

The leopard was electrocuted | त्या बिबट्याची करंट लावून केली शिकार

त्या बिबट्याची करंट लावून केली शिकार

Next
ठळक मुद्देबिबट कातडे व शिकार प्रकरण : पुन्हा पाच आरोपींना अटक, तपासाला गती

  लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना १८ नोव्हेंबरच्या रात्री नवेगावबांध पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य आरोपी देविदास दादू मरस्कोल्हे वन काेठडी दरम्यान विद्युत प्रवाहाने बिबट्याची शिकार केल्याची कबुली तपासात दिली आहे. तसेच या प्रकरणात एकूण आठ आरोपींचा समावेश असून इतर पाच आरोपींना मंगळवारी (दि.२४) अटक करण्यात आली.
१९ नोव्हेंबरला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात या तिघांना हजर करून २५ नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी मागण्यात आली होती. वन विभागाच्या तपासात पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाचआरोपींमध्ये गोवर्धन सुरेश सिंधीमेश्राम (३०) राहणार सानगाव, महेंद्र काशिराम मोहनकर (२७) राहणार सानगाव, रामाजी रूपराम खेडकर (४५) राहणार सानगडी, वसंता शालिकराम खेडकर (५०) राहणार झाडगाव व महेश धनपाल घरडे (४०) राहणार झांजिया यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी देविदास मरस्कोल्हे हा आहे. याने आपल्या साथीदारांसह बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे व अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली. अशी माहिती सूत्रांनी दिली. बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध  पोलिसांनी  दिनांक १८ नोव्हेंबरला रात्री अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविला आहे. या तिन्ही  आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना मुद्देमालासह  ताब्यात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक व प्रकाषष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधिन वनाधिकारी अग्रिम सैनी, वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे, वनरक्षक मिथून चव्हाण, विशाल बोराडे पुढील चौकशी करीत आहेत.

Web Title: The leopard was electrocuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.