बिबट्याने घेतला झाडावर आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:17+5:30

पिंपळगाव परिसरात सर्वत्र उसाची शेती आणि त्याला लागूनच जंगल असल्याने मागील काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या घराबाहेरील सुबाभुळच्या झाडावर एका बिबट्याने ठाण मांडल्याचे आढळला.

Leopard Shelter on a tree | बिबट्याने घेतला झाडावर आश्रय

बिबट्याने घेतला झाडावर आश्रय

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळगाववासीयांनी चार तास अनुभवला थरार । बिबट्याला पकडण्यात यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या बागेतील बाभळीच्या झाडावर एका बिबट्याने आश्रय घेतला होेता. यामुळे पिंपळगावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी चार तास रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याला जंगलात नेऊन सोडल्यानंतर पिंपळगाववासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पिंपळगाव परिसरात सर्वत्र उसाची शेती आणि त्याला लागूनच जंगल असल्याने मागील काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या घराबाहेरील सुबाभुळच्या झाडावर एका बिबट्याने ठाण मांडल्याचे आढळला. झाडावर बिबट्या चढला असल्याचीही माहिती क्षणभरात गावभर पसरली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. उत्सुकतेने बिबट्याला बघायला दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव शेंडे यांच्या घराभोवती गोळा झाला. नवेगावबांध वन विभागाच्या चमूला याची माहिती देण्यात आली. प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे यांच्या नेतृत्त्वात एन. के. सरकार, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे, बहुरे, वनरक्षक मिथुन चव्हाण, वनविभागाचे कर्मचारी माहिती मिळतात त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी बिबट्या चढलेल्या झाडाच्या सभोवताल जाळे पसरवले. बिबट्या झाडाखाली उतरला तर जाळीत फसेल असा वन विभागाचा कयास होता. परंतु बिबट्याने चकमा देत घटनास्थळावरून पोबारा केला. आणि शेवटी एका पडक्या घरात आश्रय त्याने घेतला. त्याच्या पुढच्या बाजुला एका दिशेला मोकळी होती.
मागचा भाग बंदिस्त असल्यामुळे, त्या घरात एका पेटी शेजारी लपून बसलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळे टाकून पकडले. वनविभागाच्या चार तासाच्या रेस्क्यू आॅपरेशननंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. यानंतर बिबट्याला जंगलात नेऊन सोडून दिले.यानंतर पिंपळगाववासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Leopard Shelter on a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.