शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

जगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी इंग्रजी शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 9:20 PM

वैश्विक ज्ञानाचे आदानप्रदान मोठ्या तीव्रतेने आजच्या तंत्रज्ञानातील संगणकीय प्रणालीने होत आहे. त्यामध्ये अधिकाधिक भाषेचा वापर इंग्रजीतच होतो. जगाच्या बोलीभाषेच्या, ग्रंथसंपदेचा विचार केल्यास ७० टक्के भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : पॅराडाईज स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : वैश्विक ज्ञानाचे आदानप्रदान मोठ्या तीव्रतेने आजच्या तंत्रज्ञानातील संगणकीय प्रणालीने होत आहे. त्यामध्ये अधिकाधिक भाषेचा वापर इंग्रजीतच होतो. जगाच्या बोलीभाषेच्या, ग्रंथसंपदेचा विचार केल्यास ७० टक्के भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. म्हणून आपल्या मातृभाषा व राष्ट्रभाषेसोबत अधिकाधिक महत्व इंग्रजीला द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.सौंदड येथील परॉडाईज किड्स केअर व उच्च प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये गुरूवारी (दि.७) वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी प्रकाश रहांगडाले यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून धनपाल रहांगडाले, भी.सी.विठ्ठले, रामेश्वर मोहबंशी, संतोष राऊत, लालचंद खडके, केशवराव यावलकर, राजश्री बडोले, देवेंद्र जनबंधू, प्रदीप मेंढे उपस्थित होते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, गाव खेड्यातील बालक किंवा महानगरात जन्मणाऱ्या बालकाची बुद्धी समसमान असते, परंतु सुरुवातीपासून त्यांची जडणघडण अगदी योग्य केल्यास, बुद्धिमत्तेचा विकास होऊन कालांतराने ध्येय गाठू शकतो. मराठी मातृभाषा, हिंदी राष्ट्रभाषा व इंग्रजी ही जगाची भाषा झाली आहे. वैश्विक ज्ञानाचा उद्रेक झाला असून जगातल्या प्रत्येक क्षेत्राची माहिती थोडीफार हवी. जगातील आर्थिक सुबत्ता व संधी प्राप्त करण्यासाठी या वाटेवरुन गेलेला विद्यार्थी जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करतील.प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री बडोले यांनी मांडले. संचालन रीना बडोले यांनी केले. आभार धनराज मेश्राम यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस