शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांमध्ये जोश निर्माण करणारा नेता हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

..... राजीव सातव हे राज्यसभेचे उत्तम सदस्य होते. लोकसेवेसाठी ते कटिबद्ध होते. त्यांच्या निधनाने दुःख आहे. युवक कँग्रेसचे ते ...

.....

राजीव सातव हे राज्यसभेचे उत्तम सदस्य होते. लोकसेवेसाठी ते कटिबद्ध होते. त्यांच्या निधनाने दुःख आहे. युवक कँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते. काँग्रेसचा एक तडफदार नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पक्षाने सुध्दा एक मनमिळावू आणि तडफदार नेता हरविला आहे. त्यांच्या निधनाने झालेले नुकसान कधीही न भरुन येणारे आहे. या संकट समयी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो हीच प्रार्थना.

- सहषराम कोरोटे, आमदार

......

खा. राजीव सातव हा तरुण चेहरा होता, त्यांच्या अकाली जाण्याने एका कुटुंबाचे, एका पक्षाचे जसे नुकसान झाले आहे. काँग्रेसमधील एक उभरता, युवा तडफदार नेता आणि उत्कृष्ट संसद पट्टू पक्षाने हरपला आहे. त्यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली आहे.

- डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी.

.......

खा. राजीव सातव यांनी अल्पकाळातच राष्ट्रीय राजकारणात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी पक्ष बळीकटी करणासाठी उत्कृष्ट कार्य केले होते. त्यामुळेच त्यांनी देशाच्या राजधानीत वेगळा ठसा उमठविला होता. त्यांच्या निधनाने समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे.

- अमर वऱ्हाडे, प्रदेश सचिव काँग्रेस

..................

काँग्रेस पक्षात जोश निर्माण करणारा मळमिळावू युवा कार्यकर्ता अशी खा. राजीव सातव यांची ओळख होती. हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यातून त्यांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र वयाच्या ४७ व्या वर्षात या युवा नेत्याच्या निधनाने पक्षाचे आणि आमची वैयक्तीक हानी झाली आहे.

- विनोद जैन, अमर वऱ्हाडे, प्रदेश सचिव काँग्रेस

......

युवकांमध्ये जोश भरणारा तडफदार नेता आणि युवक काँग्रेसला दिशा देणारा एक प्रतिभावान नेता खा. राजीव सातव यांच्या रुपाने गमावला आहे. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली असून ते कधीही भरुन न येणारी आहे.

- विशाल शेंडे, युवा नेते काँग्रेस

..............

खा. राजीव सातव यांचे व्यक्तीमत्व हे मनमिळावू होते. यांचे हसणे, त्यांचे नेतृत्व, जमिनीवर असलेला व्यक्ती,पक्षाशी निष्ठा कायम आठवणीत राहिल. पक्षातील एक कणखर आणि तडफदार नेता पक्षाने गमाविला आहे.

- जितेंद्र कटरे, युवा नेता काँग्रेस.

......