कार्यकर्त्यांची नाळ जोडून ठेवणारा नेता
By Admin | Updated: June 4, 2014 00:08 IST2014-06-04T00:08:53+5:302014-06-04T00:08:53+5:30
पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना पकडून ठेवणारे गोपीनाथ मुंडे अचानक काळाच्या पडद्याआड गेले. नुकतेच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात होते न होते

कार्यकर्त्यांची नाळ जोडून ठेवणारा नेता
चाहत्यांत शोकाकूल वातावरण : भाजप पदाधिकारी अंत्ययात्रेसाठी रवाना
गोंदिया : पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना पकडून ठेवणारे गोपीनाथ मुंडे अचानक काळाच्या पडद्याआड गेले. नुकतेच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात होते न होते तोच त्यांचा जिवनाच्या अध्यायालाच देवाने पूणर्विराम लावला. देशपातळीवरच राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व असतानाही त्यांचे गोंदियाशी नाते जुळलेले होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग गोंदियातही असल्याने सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांत शोकाकूल वातावरण दिसून येत होते. भारतीय जनता पक्षाला असहनीय धक्का लागला असून सर्वच पदाधिकारीही या घटनेवर विश्वास करीत नव्हते.
त्यांच्या गोंदिया भेटीचा एक प्रसंग सन २00५ मध्ये आला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुक प्रचारार्थ गोंदियात मुंडे आले होते. येथील सिव्हील लाईंस निवासी अभय सावंत हे त्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सक्रीय पदाधिकारी असल्याने त्यांचे ंमुंडेंशी जवळचे संबंध निर्माण झाले होते. यातूनच मुंडे यांनी सावंत यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. यावेळी त्यांच्या सोबत माजी अथर्मंत्री महादेवराव शिवणकर, त्यांचे निकटवर्ती पाशा पटेल, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय सोबत होते. तर त्यानंतर सन २00९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गोंदियात आले असता त्यांनी दुसर्यांदा सावंत परिवाराच्या निवासस्थानी भेट दिली होती.
दोन्ही भेटीत सावंत परिवाराने त्यांच्यातील साधेपणा व सर्व सामान्यांना जपणारा माणूस ओळखला होता. लहानात लहान कार्यकर्ता का असोना मात्र त्याचीही काळजी करणारा हा सच्चा नेता होता.
भाषणातून आक्रमक दिसणारे मात्र मनातून तेवढेच हळवे असणारे मुंडे आपल्या स्वभावामुळेच सर्वांच्या मनावर आपली छाप सोडून जात असल्याचे द्वारकाताई सावंत यांनी बोलून दाखविले.
तर नेतृत्वात पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांना ओळखता आले व त्यावरूनच कार्यकर्त्यांची नाळ जोडून ठेवणारा सच्चा नेता हरपल्याची प्रतिक्रिया भाजपुमोचे माजी प्रदेश सदस्य अभय सावंत यांनी व्यक्त केली. तर मुंडे यांच्या निधनाची बातमी कळताच येछील भाजपचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने त्यांच्या अंत्येष्टीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)