अखेर पूर्ण झाली ‘दत्तक आदर्श ग्राम’ची यादी

By Admin | Updated: December 24, 2014 23:03 IST2014-12-24T23:03:08+5:302014-12-24T23:03:08+5:30

ठरवून दिलेल्या मुदतीच्या सुमारे अर्धा महिना लोटून गेल्यानंतर अखेर दत्तक आदर्श गावांची यादी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांच्या अनास्थेमुळे पंचायत विभागाला

Lastly, the list of 'Dattak Adarsh ​​Gram' was completed | अखेर पूर्ण झाली ‘दत्तक आदर्श ग्राम’ची यादी

अखेर पूर्ण झाली ‘दत्तक आदर्श ग्राम’ची यादी

गोंदिया: ठरवून दिलेल्या मुदतीच्या सुमारे अर्धा महिना लोटून गेल्यानंतर अखेर दत्तक आदर्श गावांची यादी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांच्या अनास्थेमुळे पंचायत विभागाला ही यादी पूर्ण करण्यास उशिर झाला आहे. त्यातही विभागाकडून सदस्यांना फोन करून दत्तक गावांची नावे घेऊन ही यादी कशीबशी पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. यास उशिर झाल्यामुळे मेळाव्यांच्या आयोजनावरही परिणाम जाणवत आहे.
देशभरात राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाला बघता आपल्या जिल्ह्यातही असा काही उपक्रम राबविला जावा या उद्देशातून जिल्हा परिषदेने आदर्श दत्तक ग्राम उपक्रम राबविण्याचे ठरविले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व ५२ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी आपल्या क्षेत्रातील निवड केलेल्या गावांचे नाव पंचायत विभागाकडे द्यायचे होते. मात्र या उपक्रमाप्रती जिल्हा परिषद सदस्यांची अनास्था अगोदरपासूनच दिसून येत होती. त्यामुळेच दिलेल्या मुदतीत अर्ध्यापेक्षाही कमी सदस्यांच्या गावांची नावे पंचायत विभागाकडे आली होती.
जिल्हा परिषद सदस्यांच्या या उदासिनतेचा सर्वत्र वेगळाच संदेश जात असल्याने अखेर पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांनी सदस्यांना फोन करून त्यांनी निवडलेल्या गावांची नावे घेण्याचे काम सुरू केले. अखेर मुदतीनंतर अर्धा महिना उलटून गेल्यावर ५१ सदस्यांच्या दत्तक आदर्श गावांची यादी पूर्ण झाली आहे.
या यादीनुसार, गोंदिया तालुक्यातील काटी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य नरेंद्र तुरकर यांनी कासा या गावाची निवड केली आहे. तर गर्रा खुर्द क्षेत्राच्या सदस्य उषा बरडे यांनी बनाथर, कामठा क्षेत्राचे सदस्य कुंदन कटारे यांनी छिपिया, सावरीचे सदस्य नेतराम कटरे यांनी अंभोरा, नागराचे सदस्य रमेश लिल्हारे यांनी लहीटोला, दासगाव खुर्दचे सदस्य रूद्रसेन खांडेकर यांनी किन्ही, दवनीवाडाचे सदस्य अर्जुन नागपुरे यांनी महालगाव, एकोडीच्या सदस्य मिना सोयाम यांनी पारडीबांध, डोंगरगावचे सदस्य मुनेंद्र नांदगाये यांनी चुटीया, कुडवाचे सदस्य बाळकृष्ण पटले यांनी कुडवा, खमारीचे सदस्य जगदीश बहेकार यांनी तुमखेडा खु., फुलचूरचे सदस्य राजेश चतूर यांनी ढाकणी; तिरोडा तालुक्यातील अर्जुनीचे सदस्य डॉ. योगेंद्र भगत यांनी बाघोली, सेजगावचे सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी बेरडीपार, कवलेवाडाच्या सदस्य तेजेश्वरी भोंगाडे यांनी भंबोडी, सरांडीचे सदस्य पंचम बिसेन यांनी गांगला, वडेगावचे सदस्य विष्णू बिंझाडे यांनी कोयलारी, सुकडीचे सदस्य मदन पटले यांनी पिंकडेपार; आमगाव तालुक्यातील किकरीपारच्या सदस्य उषा हर्षे यांनी कालीमाटी, आमगावचे सदस्य विजय शिवणकर यांनी रिसामा, गोरठाच्या सदस्य योगेश्वरी पटले यांनी बुराडीटोला, ठाणाचे सदस्य टुंडीलाल कटरे यांनी बोथली, पदमपूरचे सदस्य रमेश बहेकार यांनी किडंगीपार, घाटटेमनीच्या सदस्य संगीता दोनोडे यांनी सितेपार; सालेकसा तालुक्यातील सालेकसा (झालीया)च्या सदस्य देवकी नागपुरे यांनी बाम्हणी, पिपरीयाच्या सदस्य प्रेमलता दमाहे यांनी पिपरीया, आमगाव खुर्दच्या सदस्य कल्याणी कटरे यांनी धानोली, कारूटोलाचे सदस्य श्रावण राणा यांनी कारूटोला; देवरी तालुक्यातील पुराडाच्या सदस्य सविता पुराम यांनी ओवारा, गोटाबोडीचे सदस्य राजेश चांदेवार यांनी मुरदोली, देवरीच्या सदस्य पार्वता चांदेवार यांनी शिरपुरबांध, ककोडीचे सदस्य संदीप भाटीया यांनी केशोरी, चिचगडचे सदस्य तुळशीराम गहाणे यांनी पिपरखारी; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधचे सदस्य मधूकर मसरकोल्हे यांनी सिरेगावबांध, गोठणगावच्या सदस्य मिना राऊत यांनी झाशीनगर, बोंडगावदेवीचे सदस्य अरविंद शिवणकर यांनी पिंपळगाव, अर्जुनी मोरगावच्या सदस्य सुरेखा नाईक यांनी कुंभीटोला, महागावच्या सदस्य किरण कांबळे यांनी बुटाई क्रमांक २, केशोरी चे सदस्य प्रकाश गहाणे यांनी वारवी, ईटखेडाचे सदस्य उमाकांत ढेंगे यांनी ईटखेडा; सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरीचे सदस्य चंद्रकांत मरसकोल्हे यांनी मुरपार/ले., डव्वाच्या सदस्य किरण गावराने यांनी डव्वा, सौंदडच्या सदस्य रूपाली टेंभूर्णे यांनी गिरोला, सडक अर्जुनीचे सदस्य मिलन राऊत यांनी दल्ली गाव दत्तक घेतले.
चिखलीचे सदस्य जागेश्वर धनभाते यांनी चिखली तर गोरेगाव तालुक्यातील गणखैराचे सदस्य मोरेश्वर कटरे यांनी सटवा, सोनीच्या सदस्य सिता रहांगडाले यांनी सिलेगाव, गिधाडीचे सदस्य विनोद अग्रवाल यांनी गिधाडी, गोरेगावच्या सदस्य बबीता टेंभुर्णीकर यांनी घोटी, कुऱ्हाडीचे सदस्य रामकिशोर राऊत यांनी बोळुंदा तसेच मोहाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कूसन घासले यांनी तेढा ही गावे दत्तक घेतली आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lastly, the list of 'Dattak Adarsh ​​Gram' was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.