येरमडाच्या तलावाचे गेट भग्नावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:06 IST2018-07-02T22:06:41+5:302018-07-02T22:06:58+5:30
येरमडा गावाच्या नावाने असलेला तलावाचे गेट मागील तीन चार वर्षांपासून भंगार अवस्थेत आहे. सन २०१७ ते २०१८ मध्ये नियोजनात समाविष्ट असलेला मग्रारोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रक मंजूर आहे. संपूर्ण उन्हाळा लोटला. परंतू वारंवार तक्र ार व सूचना करून सुध्दा लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

येरमडाच्या तलावाचे गेट भग्नावस्थेत
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येरमडा गावाच्या नावाने असलेला तलावाचे गेट मागील तीन चार वर्षांपासून भंगार अवस्थेत आहे. सन २०१७ ते २०१८ मध्ये नियोजनात समाविष्ट असलेला मग्रारोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रक मंजूर आहे. संपूर्ण उन्हाळा लोटला. परंतू वारंवार तक्र ार व सूचना करून सुध्दा लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
या तलावाचे गेट दुरुस्ती करणे महत्वाचे होते. मात्र अद्यापही तलावाचे गेट दुरूस्त करण्यात आले नाही. परंतु ते गेट तयार न करता दुसºयाच ठिकाणी सुरक्षा भिंत तयार केली. गेट नादुरूस्त असल्यामुळे तलावात पाणी साचून राहणार नाही. परिणामी शेतीला पाणी मिळणार नाही.
सुरक्षा भिंतीची गरज नसताना सुध्दा भिंतीचे काम करण्यात आले. येरमडा तलावाचा उपसा केल्यास गंतुरटोला, भवानीटोला, हनुमानटोला, जैतुरटोला या गावातील शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर होईल. परंतु आमगाव येथील जि.प.लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अधिकाºयांवर कारवाही करण्याची जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे.