शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 5:00 AM

कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात मोजकाच साठा : रुग्णांच्या संख्येत वाढीमुळे तुटवडा, अतिरिक्त दराने विक्री होत असल्याची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडयात सातत्याने वाढ होत आहे. २२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ३६०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने यासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मागील सात आठ दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे.कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढले आहे.शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालय सुध्दा हाऊस फुल आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) पुन्हा सहा खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. अशात कोविडच्या गंभीर रुग्णावर उपयुक्त समजल्या जाणाºया रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे.सद्यस्थितीत गोंदिया येथे दररोज पाचशे इंजेक्शनची मागणी आहे. पण त्या तुलनेत कंपन्याकडून पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील सहा खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून सुध्दा रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मागणी वाढलीे आहे. पंरतू गोंदियासह इतर जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत असल्याने तेथे देखील या इंजेक्शनची मागणी वाढली आहे.शासकीय रुग्णालयात मोजकाच साठायेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच शहरात पाच सहा कोविड केअर सेंटर असून येथे सुध्दा दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत केवळ ४० रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मेडिकलने पुन्हा दोन हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात सुध्दा हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती आहे.विक्रेते म्हणतात आठ दिवसात येणार साठाशहरातील औषध विक्रेत्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असून कंपन्याकडून पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. सध्या स्थितीत गोंदिया येथील औषध विक्रेत्यांकडे १० ते १५ रेमडेसिव्हीर इंजेक्शन सुध्दा मिळणे कठीेण आहे. मात्र यासंदर्भात कंपन्याशी बोलणे सुरु असून येत्या आठ दिवसात या इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.तुटवडयामुळे किमतीत वाढकोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. या इंजेक्शनची मुळ किमत ४ हजार रुपये आहे. मात्र काही औषध विक्रेते या संधीचा फायदा घेत या इंजेक्शनची सात ते आठ हजार रुपयांना विक्री होत असल्याची ओरड वाढली आहे.रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मागील आठवडाभरापासून तुटवडा आहे.या इंजेक्शनला वाढलेली मागणी लक्षात घेवून पुरवठा करणाºया कंपनीकडे मागणी केली आहे. येत्या पाच सहा दिवसात या इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध होईल. मात्र गोंदिया शहरात या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू नाही.उत्पल शर्मा, अध्यक्ष केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन गोंदियाकोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दोन हजार रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मागणी केली आहे. सद्यस्थितीेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४० इंजेक्शन उपलब्ध आहे. तसेच कोरोनावर उपचारासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या इतर गोळया आणि इंजेक्शन सुध्दा उपलब्ध आहेत.डॉ. व्ही.पी.रुखमोडे, विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :medicineऔषधंcorona virusकोरोना वायरस बातम्या