एटीएममध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST2021-01-15T04:24:17+5:302021-01-15T04:24:17+5:30
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुनीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय ...

एटीएममध्ये सुविधांचा अभाव
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुनीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांवर दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : वन्य हिंस्र प्राण्यांनी शेतशिवार व गावपरिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना मृतपाय करणे सुरू केले आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगल प्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले असून, वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
महिन्याभरात डांबरी रस्त्यावर खड्डे
आमगाव : परिसरात निम्म्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहेत. बहुतांश डांबरीकरण रस्त्यांवर महिनाभरात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांना खड्ड्यांत पॅचेस लावली जात आहेत. अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रेतीमुळे घरकुलाचे स्वप्न अधांतरीच
सालेकसा : पर्यावरणाचे कारण सांगत शासनाने रेतीघाट लिलाव केलेले नाहीत, असे असतानाही हेच शासन रस्ता तथा इमारत बांधकामे, घरकुल बांधकाम मंजूर केली आहेत. रेतीला परवानगीच नाही तर ही कामे होणार तरी कशी, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. अशातच काही रेती तस्कर चांगलाच फायदा घेत आहेत.
पालिकेने कचरापेट्यांची व्यवस्था करावी
तिरोडा : येथील सहकार नगरात नगर परिषदेच्यावतीने कचरापेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कचरापेटीविषयी मागणी करूनदेखील व्यवस्था करण्यात आली नाही.