नुकसानभरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:58 IST2017-08-26T20:58:12+5:302017-08-26T20:58:37+5:30

संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती.

Lack of compensation | नुकसानभरपाईपासून वंचित

नुकसानभरपाईपासून वंचित

ठळक मुद्देबिंदल प्लाझा आगडोंब प्रकरण : पालकमंत्र्यांनी केली होती दोन-दोन लाखांच्या मदतीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. या घटनेला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी सदर घटना घडली होती. यात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
बिंदल प्लाझामध्ये आगडोंबमधील मृतकांच्या कुटुंबीयांनी शुक्रवार (दि.२४) गोंदिया येथे एकदुसºयांची भेट घेतली. त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. हॉटेल बिंदल प्लाझाचा सध्या जीर्णोद्धार केला जात आहे. त्यांनी प्रशासनाला मागणी करीत सांगितले की, हॉटेल बिंदल प्लाझा आगडोंब प्रकरणाची पुनर्रावृत्ती होवू शकते. यासाठी सदर बांधकाम कार्य त्वरित थांबविण्यात यावे. त्यांनी हॉटेल बिंदल प्लाझाची न्यायीक तपासणी करण्याची मागणी केली.
हॉटेल बिंदल प्लाझाच्या तपासणीदरम्यान अनेक अनियमितता आढळल्या. रायपूर येथील तुलसी हॉटेलचे जीर्णोद्धार थांबविण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या वेळी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना बोलावून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
सदर आगडोंब प्रकरणात नागपूर येथील प्रेमकुमार साबू (३५) बिलासपूर येथील हरजित दीक्षित (२४), महू (मध्य प्रदेश) येथील सुरेंद्र सोनी (६३), इंदोर येथील रविंद्र लोहाडे (५४), वरोरा येथील आदित्य कुराडे (३१), सांगली येथील अभिजित पाटील, नागपूर येथील प्रवीण देशकर यांचा मृत्यू झाला होता. प्रेमकुमार यांचे काम, हरजितचे वडील रमेशचंद्र दीक्षित, सुरेंद्र व रविंद्र यांचे बहीणजावई अरूण अजमेरा, आदित्यचे वडील प्रा. अशोक कुराडे यांनी एका पत्रपरिषदेत सदर प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली.
त्यांनी सांगितले की, न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान हॉटेलच्या मालकाला ते मिळाले. मात्र त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केली नाही. त्यांनी वेगळ्या स्वरूपात नुकसानभरपाईसाठी राज्य ग्राहक न्यायालयातसुद्धा प्रकरण दाखल केल्याची माहिती दिली. हॉटेलच्या जीर्णोद्धाराचे काम बंद करण्यात न आल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असेसुद्धा मृतकांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
- कुठून आले एवढे सिलेंडर?
पोलिसांच्या अहवालात २२ सिलेंडर मिळाल्याचे नोंद आहे. एवढे मोठे सिलेंडर कुठून आले? जेव्हा रेस्टारेंट बंद होते तर त्या सिलेंडरची गरज का पडत होती? हॉटेलच्या खाली जी महासेल नामक कपड्याची दुकान होती. संपूर्ण पायºयांवर त्यांचा ताबा होता. परंतु आतापर्यंत जी महासेलच्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
फटाका दुकानांना अभय
अरूण अजमेरा यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यापासून काही अंतरावरच फटाक्यांनी अनेक दुकाने आहेत. एवढ्या दाट लोकवस्तीत ही दुकाने असावी किंवा नाही? परिसरातील नागरिकांसह अनेकदा बैठक झाली. समझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकाºयांकडे तक्रारही करण्यात आली. परंतु प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच तेथील दुकानेसुद्धा हटविण्यात आल्या नाही. एखाद्या मोठ्या घटनेची वाट तर प्रशासन पाहात नाही? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Lack of compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.