रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा शिवाजी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:25 IST2021-02-20T05:25:38+5:302021-02-20T05:25:38+5:30
बाराभाटी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रजाहितदक्ष जाणता राजा, यांनी १७ व्या शतकात आदिलशाही, निजामशाही व मुघलांच्या परकीय सत्तेच्या कचाट्यातून ...

रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा शिवाजी ()
बाराभाटी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रजाहितदक्ष जाणता राजा, यांनी १७ व्या शतकात आदिलशाही, निजामशाही व मुघलांच्या परकीय सत्तेच्या कचाट्यातून रयतेची सुटका करून स्वराज्याची निर्मिती नव्हे, तर सुराज्याची निर्मिती केल्यामुळे रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून शिवछत्रपतींचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेल्याचे प्रतिपादन पदवीधर शिक्षक सु. मो. भैसारे यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा, मोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे प्रमुख मोहन नाईक, वामनराव घरतकर, अचला कापगते-झोडे, प्राची कागणे-ठाकूर उपस्थित होते. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणे राज्य करणाऱ्या राजाचे शेतीविषयक धोरण, उद्योग व व्यापारी धोरण, कामगारविषयक धोरण, लष्करी धोरण प्रचलित शासन व्यवस्थेसाठी अनुकरणीय असून, सक्षम राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यासाठी इतिहासाचा बोध घेऊन, सुराज्य निर्मितीसाठी समाज व्यवस्थेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम गहाणे यांनी मांडले. सूत्रसंचालन जितेंद्र ठवकर यांनी केले तर आभार मोहन नाईक यांनी केले. कार्यक्रमासाठी यश लाडे, मुक्ताई लोदी, कृतिका लाडे, कशक शहारे, काजल रावेकार, भावेश जनबंधू, सायली अंबादे, उमा राऊत यांनी सहकार्य केले.