शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

विळ्याने मारून मावस्याला केले ठार

By admin | Updated: November 8, 2014 22:40 IST

शहरालगतच्या चांदनीटोला (नागरा) येथील घनश्याम नत्थुराम मस्करे (४८) यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून शेजारीच राहणाऱ्या युवकाने त्यांना ठार केले. मृत इसम मारेकऱ्याचा मावसा आहे.

गोंदिया : शहरालगतच्या चांदनीटोला (नागरा) येथील घनश्याम नत्थुराम मस्करे (४८) यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून शेजारीच राहणाऱ्या युवकाने त्यांना ठार केले. मृत इसम मारेकऱ्याचा मावसा आहे. या प्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून हे कृत्य करणाऱ्या इसमाला निगराणीत ठेवले आहे. चांदनीटोला (नागरा) येथील लक्ष्मण गुलाब लिल्हारे (३२) याने विळ्याने घराशेजारच्या घनश्याम नत्थूराम मस्करे याच्या गळ्यावर वार केले. ही घटना शुक्रवारच्या दुपारी १२ वाजतादरम्यानची आहे. घटनेनंतर घनश्यामला डॉ.एन.एम. बजाज यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घनश्यामचा ८ नोव्हेंबरच्या पहाटे २.३० वाजता मृत्यू झाला. ग्रामीण ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप झिले यांनी सदर घटनेची तक्रार नोंदविली.आरोपी लक्ष्मण लिल्हारे मृतकाच्या घराशेजारी राहतो. ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे बोलले जाते. घनश्याम लक्ष्मणचा मावसा लागतो. मागील काही वर्षापासून लक्ष्मण मनोरुग्ण आहे. तो काहीही बडबडत असतो. तो मंदिरात झोपतो व जेवन घनश्यामच्या घरी करीत होता.या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्याशी चर्चा केल्यावर ते म्हणाले, लक्ष्मनला आरोपी बनवू शकत नाही. नागरिकांच्या बयानानंतर त्याला मनोरुग्ण असल्याचे दाखविण्यात आले. त्याला आठ दिवस वेड्यांच्या रूग्णालयात ठेवण्याचा सल्ला मनोरूग्न तज्ज्ञांनी दिला आहे. लक्ष्मण याची विचारपूस करण्यात आली, परंतु वेळोवेळी तो आपले बयान बदलत असतो. कधी तो मृतकाला देशद्रोही म्हणतो तर कधी आपले बयान बदलवितो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास करता येत नाही असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी त्याला ‘अनफिट’ घोषित केले तर त्याला वेड्यांच्या दवाखान्यात पाठविले जाऊ शकते.