सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:28+5:30
कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला असता तरूणाचा मृतदेह अडकून आला होता.मृताची ओळख न पटल्याने पोलीस पाटील जितेंद्र बडोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.

सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत कोटरा डॅममध्ये मिळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दारूच्या नशेत भांडण करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून तिघांनी त्याला ठार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृताचे नाव रितीक नरेंंद्र चुटे (१८,रा.चावडी चौक, छोटा गोंदिया) असे आहे.
कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला असता तरूणाचा मृतदेह अडकून आला होता.मृताची ओळख न पटल्याने पोलीस पाटील जितेंद्र बडोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. तसेच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशावरून मृताची ओळख पटविण्यासाठी मृताचे छायाचित्र व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. अशात सायंकाळी नरेंद्र चुटे यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात जाऊन मृत तरूण त्यांचा मुलगा रितीक चुटे असल्याचे सांगीतले. चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे यांचे २ पथक व सालेकसाचे निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी पथक सोधकामासाठी रवाना केले. तपासांतर्गत पोलिसांनी आयुष सुरेंद्र बोरकर (२०), नितेश उर्फ सागर गोविंद तिघारे (२१) व मयुर सुभाष डोंगरगाव (२०,रा.छोटा गोंदिया) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांना खून केल्याचे कबूल केले.
असा केला रितीकचा गेम
आरोपी आयुष बोरकर हा सोमवारी (दि.१२) रात्री १० वाजतादरम्यान चावडी चौकात मोबाईल बघत बसला असता रितीकने दारूच्या नशेत त्याला शिविगाळ केली व दुचाकी रात्री फोडतो असे बोलून धक्काबुक्की केली. यापूर्वीही रितीकने चाकू दाखवून आयुषला धमकाविले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून आयुषने आपला मित्र सागर व मयुर यांच्या मदतीने दुचाकीवर बसवून जिल्हा परिषद जवळील शिव मंदिरात नेले व समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र रितीक उलट त्यांना बघून घेण्याची धमकी देऊ लागला. यावर तिघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली व दुचाकीवर बसवून ठाणामार्गे साखरीटोलाकडे नेत असताना रितीकने दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला. यावर सागरने त्याचा गळा आवळला मात्र तो मेला नाही. अशात तिघांनी त्याला कोटरा डॅम येथे नेले व दगडाने डोक्यावर मारून ठार केले व डॅमच्या पाण्यात टाकून दिले.