फरार आरोपीस केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:10+5:30
सालकेसा पोलीस ठाण्यांतर्गत सन २०१४ मध्ये कलम-२०,२९ एन.डी.पीएस. मधील आरोपी नाम राघवेंद्र राजपूत (रा.हरदोली, म.प्र.) हा सन २०१४ पासून गुन्ह्यात अटक झाला नाही. यावर न्यायालयाने त्याचा वॉरंट काढून तामील करण्यास दिले. यावर सपोनि राजकुमार डुणगे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस नायक अनिल चक्रे व शिपाई लोकेश यादव यांना परप्रांतात पाठवून आरोपीची गोपनीय माहिती काढली. तसेच मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेवून रविवारी (दि.५) अटक करुन न्यायालयात सादर केले.

फरार आरोपीस केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सन २०१४ पासून एका गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी परप्रांतातून त्याला अटक करून आणले आहे.
सालकेसा पोलीस ठाण्यांतर्गत सन २०१४ मध्ये कलम-२०,२९ एन.डी.पीएस. मधील आरोपी नाम राघवेंद्र राजपूत (रा.हरदोली, म.प्र.) हा सन २०१४ पासून गुन्ह्यात अटक झाला नाही. यावर न्यायालयाने त्याचा वॉरंट काढून तामील करण्यास दिले. यावर सपोनि राजकुमार डुणगे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस नायक अनिल चक्रे व शिपाई लोकेश यादव यांना परप्रांतात पाठवून आरोपीची गोपनीय माहिती काढली. तसेच मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेवून रविवारी (दि.५) अटक करुन न्यायालयात सादर केले.
इसमाने केली शिविगाळ
गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम चिल्हाटी येथील ३० वर्षीय महिला ४ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता एकटी घरात होती. यावेळी एक आरोपी त्यांच्या घरात शिरला. त्याला महिलेच्या पती व दिराने पकडले असता आरोपीने त्यांना शिविगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. सदर घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, ४४८, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.