शेंडा ते सडक-अर्जुनी मार्ग ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:41+5:30

नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्स या कंपनीकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किंमत २२ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या कामाची मंजूरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. मात्र आजघडीला या रस्त्याचे बांधकाम १ मिटर सुद्धा पूर्ण झाले नाही. हे विशेष. एकाच रस्त्यावर वारंवार खोदून गिट्टी व मुरुम टाकण्याचेच काम सुरु आहे.

Kardankal is the road from Shenda to Arjuni | शेंडा ते सडक-अर्जुनी मार्ग ठरतोय कर्दनकाळ

शेंडा ते सडक-अर्जुनी मार्ग ठरतोय कर्दनकाळ

ठळक मुद्देप्रवाशांना करावी लागते कसरत, लोकप्रतिनिधींची डोळेझाक

वामन लांजेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : शेंडा ते सडक-अर्जुनी मार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. सध्या रेंगेपार पहाडी ते खोल ढोडीपर्यंत ६ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम मागील २ वर्षांपासून सुरु असून आजपावेतो १ मिटर रस्त्याचे काम पूर्णत्वास आले नाही. जागोजागी गिट्टीचे ढिगार पडले आहेत, तर काही ठिकाणी मुरुमाचा लेप दिला आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झाल्याने रस्ता चिखलमय झाला असून परिणामी वाहन चिकट मातीत फसत असून पुढे सरकत नाही. त्यामुळे वाहन कोठून व कसे चालवावे असा पेच निर्माण झाला आहे. एकंदरीत हा रस्ता येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्स या कंपनीकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किंमत २२ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या कामाची मंजूरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. मात्र आजघडीला या रस्त्याचे बांधकाम १ मिटर सुद्धा पूर्ण झाले नाही. हे विशेष. एकाच रस्त्यावर वारंवार खोदून गिट्टी व मुरुम टाकण्याचेच काम सुरु आहे. यावरुन हे काम पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे.
या रस्त्यावरुन ये-जा करणाºयांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वाहनचालक गंभीर जखमी झाले, तर काही फ्रॅक्चर झाले. सडक-अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कार्यालयीन कामानिमित्त लोकांना याच मार्गाने जावे लागते. तसेच या परिसरात होणाºया सामाजिक अथवा आयोजित कार्यक्रमांसाठी लोकप्रतिनिधी याच मार्गाने ये-जा करतात. परंतु या बांधकामाकडे दुर्लक्ष करून सरळ निघून जातात.
सदर मार्गाच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (सावंगी) कडून तांत्रिक अधिकारी नेमले आहेत. परंतु मार्गाची अवस्था बघितली तर सदर कामावर कोणत्याच प्रकारची देखरेख नसावी असे वाटते. नवीन मार्गाचे बांधकाम करताना प्रवाशांच्या सोईसाठी एका बाजूने बांधकाम करुन दुसरी बाजू मोकळी ठेवायला पाहिजे होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ताच खोदण्यात आल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Kardankal is the road from Shenda to Arjuni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.