शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कन्यादान व शुभमंगल निधीत वाढ करणार

By admin | Updated: May 9, 2015 23:52 IST

पैशाची मोठ्या प्रमाणात बचत करण्यासाठी आणि समाजात एकोपा वाढीसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ...

पालकमंत्री बडोले : आदिवासी हलबा-हबली सामूहिक विवाह सोहळा, ३३ जोडपी विवाहबद्धगोंदिया : पैशाची मोठ्या प्रमाणात बचत करण्यासाठी आणि समाजात एकोपा वाढीसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक न्याय विभाग अशाप्रकारच्या विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देणार असून कन्यादान व शुभमंगल योजनेंतर्गत लाभार्थ्यांला देण्यात येणाऱ्या निधीत २५ हजार रुपयापर्यंत वाढ करणार, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला (बाराभाटी) येथे रविवारी हलबा-हलबी संघटनेच्या वतीने हलबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या वेळी ते मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, माजी आ. रामरतन राऊत, दयाराम कापगते, पंचायत समितीचे सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश रामटेके, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा नाईक, डॉ. नामदेव किरसान, भागवत नाकाडे, डॉ. गजानन डोंगरवार, नामदेव कापगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदर सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. विवाहबद्ध होणाऱ्या जोडपण्यांना मान्यवरांनी आशीर्वाद दिले. २० हजार वऱ्हाड्यांची सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती होती. ना. बडोले पुढे म्हणाले, लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर खरेदी करण्याची प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात लवकरच धान खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येतील. कुंभीटोला येथे आदिवासी समाज भवनासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नवदाम्पत्यांना भेटवस्तू देऊन आशीर्वाद दिले. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या हलबा-हलबी समाजातील विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तानेश ताराम यांनी, संचालन व आभार मोहन नाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी आदिवासी हलबा-हबली सामूहिक विवाह सोहळा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)