लोहिया विद्यालयात संयुक्त सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:01+5:302021-01-24T04:13:01+5:30
सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड ...

लोहिया विद्यालयात संयुक्त सभा
सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त वतीने इयत्ता ५ ते ८चे वर्ग सुरू करण्यासाठी ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षकांची संयुक्त सभा शुक्रवारी (दि.२२) घेण्यात आली.
संस्थापक जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या सभेला सरपंच तथा ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती अध्यक्ष गायत्री इरले, उपसरपंच सुनील राऊत, ग्रामविस्तार अधिकारी नागलवाडे, तलाठी यू.एस.वाघधरे, आरोग्यसेवक ए.बी. ठाकरे, शमीम अहमद सैय्यद, ग्रामपंचायत सदस्य सचिन प्रभुदयाल लोहिया, नलीराम चांदेवार, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, मुख्याध्यापक मनोज शिंदे, मुख्याध्यापिका संयुक्ता जोशी, पर्यवेक्षिका कल्पना काळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी जगदीश लोहिया यांनी, विद्यालयात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ ते १२वीचे वर्ग सुरू असून, आजपर्यंत एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झाला नाही, ही गौरवाची बाब असून, ५ ते ८वीचे वर्ग सुरू करण्यास काही हरकत नाही, असे मत व्यक्त केले. सरपंच इरले, सहा.शिक्षक डी.एस.टेंभुर्णे, पालक अंजू रामटेके, तसेच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २७ जानेवारीपासून इयत्ता ५ ते ८वीचे वर्ग सुरू करण्यास काही हरकत नाही, असे मत व्यक्त केले. प्राचार्य अग्रवाल यांनी, ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण देताना अनेक अडचणी येतात. पालक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ असतात. त्यामुळे इयत्ता ५ ते ८वीच्या वर्गास पालकांनी संमतीपत्र देऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे सांगीतले. आभार सहायक शिक्षक टी.बी. सातकर यांनी मानले. यावेळी ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.