नकली बिडीप्रकरणी गोंदियातील "जिम्मी" गुप्ताला बुलडाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:16+5:302021-02-05T07:48:16+5:30
गोंदिया : संपूर्ण राज्यात बनावट बिड्यासुद्धा विकल्या जात आहे. या गोष्टीचा खुलासा बुलडाणा जिल्ह्यात झाला. याप्रकरणी उंट बिडी ...

नकली बिडीप्रकरणी गोंदियातील "जिम्मी" गुप्ताला बुलडाण्यात अटक
गोंदिया : संपूर्ण राज्यात बनावट बिड्यासुद्धा विकल्या जात आहे. या गोष्टीचा खुलासा बुलडाणा जिल्ह्यात झाला. याप्रकरणी उंट बिडी कंपनीच्या मॅनेजरच्या तक्रारीवरून बुलडाणा जिल्ह्याच्या साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन एसपी डॉ. दिलीप भुजबळ यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या नकली बिडीच्या व्यवसायात लुप्त असलेला मुख्य आरोपी सुनील ऊर्फ "जिम्मी" जनकराज गुप्ता याला बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने गोंदिया येथून २७ जानेवारी रोजी अटक केली आहे. आरोपी ३ दिवस पीसीआरमध्ये होता व पीसीआर संपल्याने आरोपी जिम्मीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून बुलडाणा पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपी "जिम्मी"ला अखेर बुलडाणा एसपी अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे नकली बिडीचा व्यवसाय करणाऱ्या इतर तस्करांचेसुद्धा धाबे दणाणले आहेत. त्या गुन्ह्यातही जिम्मीला आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.