दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:45 IST2020-09-24T18:44:15+5:302020-09-24T18:45:52+5:30
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान शहीद
लोकमत न्यूज नेट वर्क
गोंदिया : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार आहे.