जैन कलार समाज सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:49+5:302021-01-13T05:15:49+5:30
दरवर्षी समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात; पण यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व शासकीय ...

जैन कलार समाज सभा उत्साहात
दरवर्षी समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात; पण यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व शासकीय परवानगी नसल्यामुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसा ठराव कार्यकारिणी मंडळात पारित करण्यात आले. समाज भवन किरायाने देणे, सभासद नोंदणी मोहीम सुरु करणे, परिसर सुशोभित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क मार्गदर्शन करणे व इतर समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. सचिव शालिकराम लिचडे, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे, सहसचिव सुखराम खोब्रागडे, यशोधरा सोनवाणे, कार्यकारिणी सदस्य अतुल खोब्रागडे, उमेश भांडारकर, नामदेव सोनवाणे, डी.टी. कावळे, मनोज भांडारकर, वरुण खंगार, संजय मुरकुटे, विजय ठवरे, रोशन दहीकर, मनीष ठवरे, राजकुमार पेशने, देवानंद भांडारकर, मनोज किरणापुरे, प्रदीप आष्टीकर, वीणा सोनवाणे, हर्षा आष्टीकर, ज्योती किरणापुरे, उषा मोरघडे व पद्मा भदाडे यांनी भाग घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शालिकराम लिचडे यांनी केले. आभार वरुण खंगार यांनी मानले.