जैन समाजाचा ‘मूक मोर्चा’ आज

By Admin | Updated: August 24, 2015 01:43 IST2015-08-24T01:43:48+5:302015-08-24T01:43:48+5:30

जैन समाजातील संथारा/संल्लेखना या धार्मिक प्रथेच्या समर्थनार्थ जैन समाजाच्यावतीने सोमवारी (दि.२४) मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

Jain community's 'silent morcha' today | जैन समाजाचा ‘मूक मोर्चा’ आज

जैन समाजाचा ‘मूक मोर्चा’ आज

गोंदिया/देवरी : जैन समाजातील संथारा/संल्लेखना या धार्मिक प्रथेच्या समर्थनार्थ जैन समाजाच्यावतीने सोमवारी (दि.२४) मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने जैन समाजातील संथारा या धार्मिक प्रथेला आत्महत्या निश्चीत करून दंडनीय अपराध म्हटले आहे. याचा विरोध करण्यासाठी जैन समाजाच्यावतीने या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यांतर्गत गोंदियात सकाळी ११.३० वाजता गोरेलाल चौक स्थित जैन मंदिरातून हा मूक मोर्चा निघेल. शहरातील मुख्य मार्गाने होत उपविभागीय कार्यालयात मोर्चा जाणार असून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. तर देवरीत सकाळी १० वाजता दिगंबर जैन मंदिरातून मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे.

Web Title: Jain community's 'silent morcha' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.