इतवारी- गोंदिया मेमू गाडीचा बालाघाट पर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 09:45 PM2019-02-19T21:45:21+5:302019-02-19T21:46:04+5:30

गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे.

Itavari- Gondiya MEMU train extended up to Balaghat | इतवारी- गोंदिया मेमू गाडीचा बालाघाट पर्यंत विस्तार

इतवारी- गोंदिया मेमू गाडीचा बालाघाट पर्यंत विस्तार

Next
ठळक मुद्देशुक्रवारपासून सेवेत : बालाघाटवासीयांना होणार सोयीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी बालाघाटवासीयांसाठी वरदानच ठरणार आहे.
येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथून दुपारी ३.१० वाजता सुटणारी गाडी सायंकाळी इतवारी येथे पोहचत होती व तेथून परत गोंदियाला येत होती. ही गाडी आता बालाघाट येथून दुपारी ३.१५ सुटणार व गोंदिया येथे ४.१५ वाजता पोहचेल. तर गोंदियाहून इतवारीसाठी ४.२० वाजता रवाना होणार. इतवारी स्थानकावर या गाडीची वेळ सायंकाळी ६.२५ निर्धारीत करण्यात आली आहे. इतवारीहून गाडी क्रमांक ६८७१४ सकाळी १०.३५ वाजता गोंदिया-बालाघाट साठी सुटेल. गोंदियात ही गाडी दुपारी २ वाजता पोहचून गोंदियाहून दुपारी २.०५ वाजता सुटून ३.१५ वाजता बालाघाट पोहचणार आहे.
गोंदियासाठी निराशाजनक बातमी
गोंदिया-इतवारी मेमू गाडीचा विस्तार नागपूर पर्यंत प्रवास करणाºया येथील प्रवाशांसाठी निराशाजनक आहे. आता ही गाडी बालाघाट येथूनच भरून गोंदिया पोहचणार व येथील प्रवाशांना गाडीत जागा शोधावी लागणार. विशेष म्हणजे, यापूर्वी गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या सकाळच्या मेमू गाडीलाही डोंगरगडपर्यंत विस्तारीत करण्यात आले होते. त्यात आता गोंदियाहून तयार होणारी दुसरी गाडीही हिसकाविण्यात आली आहे. आता गोंदियाहून तयार होवून नागपूरसाठी जाणारी एकही प्रवासी गाडी उरलेली नाही.

Web Title: Itavari- Gondiya MEMU train extended up to Balaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे