शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे आपल्याच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:23 IST

गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त असून विविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यात अनके दुर्मिळ वनस्पती सुध्दा आहे. जगातील दोन तर महाराष्ट्रातील १९ दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या १९ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील १९ दुर्मिळ वनस्पतींची नोंद : संवर्धनासाठी उपाययोजनांची गरज

अंकुश गुंडावारगोंदिया : गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त असून विविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यात अनके दुर्मिळ वनस्पती सुध्दा आहे. जगातील दोन तर महाराष्ट्रातील १९ दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या १९ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात. या वनस्पतींचा मागील ३१ वर्षांपासून अभ्थास करुन त्यांचे संवर्धन करण्याचे काम आमगाव येथील भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे हे करीत आहेत.गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात पाणथळ जागेत आढळणाºया अनेक वनस्पती असून राज्यात आढळणाºया पाणथळ वनस्पतींच्या ७८ टक्के वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात.वनस्पती दृष्टया जैवविविधतेने नटलेल्या आपल्या जिल्ह्यातील दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे हे आपल्याच हाती असून त्यासाठी सर्वांनीच पर्यावरणा प्रती सजग राहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील विविध दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करुन जगाला या वनस्पतींची माहिती व महत्त्व पटवून देण्याचे काम डॉ.भुस्कुटे करीत आहे. मागील ३१ वर्षांपासून त्यांच्यावर अभ्यास सुरू आहे. यातूनच त्यांनी नायकीया कर्नी व फिब्रीस्टॅलीस पोकळी या दोन वनस्पतींचा शोध घेवून जगाला माहिती दिली. तर देशात ज्या चार दुर्मिळ वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात त्यात इलीओकॅरीस एन्सप्स, फिब्रीस्टॅलीस अ?ॅडीनोलेपीस, फिब्रीस्टॅलीस अबलोगा, स्कोपस प्रोलोंगट्स या वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पती अस्तित्व धोक्यात आहे. तसेच जिल्ह्यात ११ किटक भक्षी वनस्पती असून यामध्ये युट्रीक्युुॅरिया व ड्रॉसेरा या दोन प्रजातींच्या अनुक्रमे आठ व अनुक्रमे दोन जाती आढळतात. डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी युट्रीक्युॅरिया फोव्हुओलॅटा ही दुर्लभ किटक भक्षी वनस्पती शंभर वर्षांनंतर पुन्हा शोधून काढली हे विशेष. यापूर्वी ही वनस्पती आमगाव जवळील गोंडीटोला या गावालगत अतिशय छोट्या जागेत आढळली होती. या वनस्पतींचे जतन करणे फार महत्त्वाचे असून महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यातच या १९ वनस्पती आढळतात. यामध्ये औषधीयुक्त गुणधर्म देखील असून त्यांचे फार महत्त्व आहे.बासरी तयार करण्यासाठी उत्कृष्ट बांबुसालेकसा तालुक्यातील दरेकसा हा परिसर जंगलाने समृध्द असा परिसर आहे. या जंगलात अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून येतात. याच जंगलात एक बांबुची प्रजाती आढळून येते, जी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही आढळून येत नाही. या बांबुचे शास्त्रीय नाव ह्यसायझोस्टॅकीयम परग्रासीलह्ण असून या बांबुपासून उत्कृष्ट बासºया तयार करता येतात. विशेष म्हणजे डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी या बांबुपासून बासºया तयार केल्या असून त्या करण्याचे सोपे तंत्र सुध्दा त्यांनी विकसीत केले आहे.

वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरजअपुष्प वनस्पती गोंदिया जिल्ह्यात विपुल प्रमाणात आढळतात.नेचे वगार्तील वनस्पती होमोनायटीस ऐरीफोलीया व ऑफीओग्लॉसम न्युडीकॉल व्हरायटी मॅकोरायझा या दोन वनस्पती केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतात. सायलोटम न्युडम ही नेचे वर्गीय वनस्पती केवळ दरेकसा येथील अंबेझरण परिसरात आढळते. ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काश्मिरात डल लेकमध्ये आढळणारी वनस्पती काटेचिला ही केवळ नवेगावबांध तलावात विपुल प्रमाणात आढळून येते. यासर्व वनस्पतींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.वनस्पती दृष्टया जैवविविधतेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व आपल्यालाच टिकावायचे आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून वनस्पतीशास्त्र शिकविणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी व व वनस्पतीप्रेमी यांचा यात सहभाग महत्त्वपूर्ण आहे.- डॉ.श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य भवभूती महाविद्यालय आमगाव.

टॅग्स :wildlifeवन्यजीव