शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग यार्ड जागेचा विषय प्राधान्याने सोडविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत गरजेचे झाले. यातूनच नगर परिषदेने आतापर्यंत टेमनी, रतनारा, फुलचूर आदि गावांत प्रकल्पासाठी जागेची मागणीही केली होती. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. असे असतानाच आता नगर परिषदेला ग्राम सोनपुरी येथे जागा नजरेत आली असून त्यासाठी तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देशहरातील कचऱ्याची लागणार विल्हेवाट : सोनपुरीतील जागेला घेऊन वाढल्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागेला घेऊन शोध मोहीम सुरू आहे. अशात कित्येक गावांनी जागेसाठी नकार दिल्याने नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप तयार झाला नाही. अशात आता ग्राम सोनपुरी येथील जागा नगर परिषदेच्या नजरेत असून ती जागा मिळाल्यास व प्रकल्प उभा झाल्यास अवघ्या शहरातील कचऱ्याची समस्या सुटणार यात शंका नाही.जिल्ह्यातील नगर पंचायतींकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र नगर परिषदेकडे अद्याप प्रकल्प नसल्याने सर्वांनाच आश्चर्य होते. शिवाय शहरात दिवसाला निघणाऱ्या सुमारे ५२ टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होत आहे. नगर परिषद सध्या मोक्षधाम परिसरात कचरा टाकत आहे.मात्र हा प्रकार धोकादायक आहे. परिणामी नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत गरजेचे झाले. यातूनच नगर परिषदेने आतापर्यंत टेमनी, रतनारा, फुलचूर आदि गावांत प्रकल्पासाठी जागेची मागणीही केली होती.मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. असे असतानाच आता नगर परिषदेला ग्राम सोनपुरी येथे जागा नजरेत आली असून त्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यातील सभेत यावर निर्णय झाला नाही. त्यानंतर ३ महिने कोरोनामुळे सभा घेता आली नाही व तो विषय आणखी रेंगाळला.जून महिन्यातील सभेत विषय घेण्यात आला असता त्यावर निर्णय लागला नाही. परिणामी आता या महिन्यातील सभेत तरी या विषयाचा सोक्षमोक्ष लागावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.टास्क फोर्स ने दिले होते नोटीसनगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्याबाबत जिल्हा टास्क फोर्सने नगर परिषदेला जानेवारी महिन्यात नोटीस दिला होता. यात नगर परिषदेला १ महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे हे काम रखडत चालले असल्याने हरकत नाही. मात्र आता सोनपुरीच्या जागेचा विषय गांभीर्याने घेत हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. असे झाल्यास हे वर्ष नगर परिषदेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहण्यात येणार यात शंका नाही.शहराचा होणार कायापालटनगर परिषदेला सोनपुरीची जागा मिळाल्यास व तेथे प्रकल्प उभा झाल्यास गोंदिया शहराचा कायापालट होणार. शहरातील कचºयाची समस्या सुटणार असतानाच संबंधित गावातील तरूणांना रोजगार मिळणार. शिवाय कचऱ्यापासून खत निर्मिती झाल्यास त्याचा लाभही गावकरी घेऊन शकतील. एवढेच नव्हे तर त्या गावातील कचऱ्याची समस्या सोडविता येणार. प्रकल्पामुळे गोंदिया शहराला फायदा होणार असतानाच सोबतच त्या गावाची कचऱ्याची समस्याही सुटणार यात शंका नाही.

टॅग्स :dumpingकचरा