स्थायी समितीत आज गाजणार अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा
By Admin | Updated: September 28, 2015 02:04 IST2015-09-28T02:04:03+5:302015-09-28T02:04:03+5:30
जिल्हा परिषदेच्या सोमवारी (दि.२८) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून ...

स्थायी समितीत आज गाजणार अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा
सदस्यांची सहमती : ठराव होण्याची शक्यता
वडेगाव : जिल्हा परिषदेच्या सोमवारी (दि.२८) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून यासंबंधीचा ठराव स्थायी समिती मंत्रालयात पाठविण्यात अनुकूल असल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अंशदायी पेन्शन योजनेत मोडले आहे. त्यांची जुनी पेन्शन बंद करण्यात आली. याविरोधात गोंदिया जिल्हा अंशदायी पेन्शन धारक शिक्षकांनी गोंदिया जि.प. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली.
जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य रमेश अंबुले, शोभेलाल कटरे, रजनी कुंभरे, राजलक्ष्मी तुरकर, उषा शहारे, सुरेश दुबे, हमीद अश्ताफ अकबर अली, जि.प.चे सर्व सभापती व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांशी सहमत असून सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अनुकूल आहेत. त्यासंबंधीचा ठराव लवकरच जि.प.कडून राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे वृत्त आहे. सदस्यांच्या भेटीप्रसंगी अंशदायी पेन्शन शिक्षक संघटनेचे संतोष रहांगडाले, महेंद्र चौव्हान, राजकुमार बसोने, विनेश खांडेकर, मुकेश रहांगडाले, लिकेश हिरापुरे, पंकज असाटी, गुणवंत शेंडे व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)