शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन सुविधा देणारे कालवे अतिक्रमणात

By admin | Updated: November 23, 2014 23:23 IST

बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे.

आमगाव : बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतीला सिंचन सुविधा देणारे कालवे अतिक्रमणधारकांनी खाजगी मालमत्ता समजून त्यावर पक्के घर तसेच रस्त्यांचे बांधकाम सुरु केले आहे.आमगाव येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनातील उपविभागीय कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधेकरीता शासनाने कोट्यवधींचा निधी कालवे बांधकामासाठी खर्च करुन बाघ कालव्यांचे बांधकाम पूर्ण केले. धरण व कालव्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी शासनाचा निधी कमी पडत नाही. परंतु कालव्यांच्या संरक्षणासाठी विभागातील अधिकारी कामचुकारपणा करीत असल्यामुळे कालव्यांच्या जमिनी खासगी वापरात जात आहेत. बाघ इडियाडोह पाटबंधारे उपविभागाअंतर्गत पुजारीटोला, कालिसराड, सिरपूर या सिंचन धरणासह कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदरारी शासनाने निश्चित केली आहे. पाणी साठवण धरणातील सिंचन सुविधा व कालव्यांच्या व्यवस्थापनाकरीता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असताना धरण व कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्यामुळे सिंचन सुविधा मागे पाडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी सिंचनाची सोय अपुरी पडून समस्या निर्माण झाली आहे. आमगाव, बनगाव, रिसामा या परिसरातून बांधकालव्यांची जागा खासगी वापराकडे गेली आहे. या परिसरात धरणाकडून येणारे कालवे लोकवस्तींनी वेढलेले आहे. नागरिकांनी या कालव्यांवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले दिसत आहेत. धरणातून निघालेले कालवे व त्यासह असलेली पाणवट मिळून ८० फुटाचा रुंदी भूभाग सिंचन सुविधांसाठी राखीव आहे. परंतु या कालव्यांसह पाणवटातून वाहणाऱ्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. याकडे अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, परंतु अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये असलेल्या संबंधांमुळे शासनाचेच विभाग कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून अतिक्रमणाला बळ देत आहेत. आमगाव तालुक्यातील कालवा प्रवाह वाहणाऱ्या जागेवर अतिक्रमाणाचा वेढा वाढत असल्याने कालवे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण व कालवा परिसरातील अतिक्रमणाला वेळ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)